maharashtra shaheer, the kerala story, kedar shinde, the kerala story tax free, the kerala story controversy, the kerala story showtimings, the kerala story full movie, maharashtra shaheer full movie,
maharashtra shaheer, the kerala story, kedar shinde, the kerala story tax free, the kerala story controversy, the kerala story showtimings, the kerala story full movie, maharashtra shaheer full movie, SAKAL
मनोरंजन

दुर्दैव.. 'महाराष्ट्र शाहीर'ला डावलून 'द केरला स्टोरी' ला राजकीय पाठिंबा मिळाल्याने केदार शिंदे भडकले..

Devendra Jadhav

Kedar Shinde angry on The Kerala Story: सध्या सगळीकडे एकाच सिनेमाचं प्रकरण गाजतंय ते म्हणजे द केरला स्टोरी. हा सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'द केरला स्टोरी' ने मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वेगळ्याच विषयाला तोंड फुटले आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या द केरला स्टोरीच्या वादाचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे.

अशातच महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shaheer) सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

(Maharashtra Shaheer director Kedar Shinde got angry after getting political support for 'The Kerala Story')

'द केरला स्टोरी' सिनेमाला राजकीय रंग चढला आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी या सिनेमाबद्दल त्यांची मतं मांडली आहेत.

अशातच महाराष्ट्र शाहीर या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केलीय केदार शिंदेंनी ट्विट करून त्यांचा संताप व्यक्त केलाय.

केदार शिंदे ट्विट करून लिहितात... "दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत.

या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असं ट्विट करून केदार शिंदेंनी त्यांची तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. अजूनही हा सिनेमा महाराष्ट्रातील थिएटरमध्ये तुफान गर्दीत सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहिला आणि कौतुक केलं.

तरीही महाराष्ट्रातील राजकीय नेते महाराष्ट्र शाहीर सारखा महत्वाचा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी द केरला स्टोरी सारख्या सिनेमाला प्रमोट करतायत म्हणून केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केलीय.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या चित्रपटावरुन कॉग्रेसला धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. देशामध्ये जे काही घडते आहे तेच या चित्रपटामध्ये दिग्दर्शकानं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

असे सांगून मोदींनी द केरळ स्टोरीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर हा चित्रपट टॅक्स फ्री करावा. अशी मागणी केली गेली.

मध्यप्रदेशामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. आता तो महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT