actor dattu more : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे दत्तू मोरे. प्रोडक्शन मधून आलेला हा मुलगा आपल्या कामातून महाराष्ट्राला वेड लावत आहे. सध्या दत्तूच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली आहे. या घटनेने त्याचे आयुष्यच बदलून टाकले आहे.
(maharashtrachi hasyajatra fame actor dattu more name was given to his chawl in thane)
दत्तू हा ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत लहानाचा मोठा झाला. अजूनही तो त्याच चाळीत राहतो. त्याच्या या यशाबद्दल त्याच्या चाळकाऱ्यांना प्रचंड अभिमान आहे. म्हणून त्यांनी दत्तू साठी एक खास भेट दिली आहे. ती म्हणजे दत्तू ज्या चाळीत राहतो त्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असे नाव देण्यात आले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दत्तूने हे सांगितले आहे. विशेष म्हणजे या घटनेने त्याच्या आयुष्यात नवा आनंद आला आहे.
दत्तू म्हणतो, 'मी राहत असलेल्या चाळीला याआधी कोणतंच नाव नव्हतं. चाळ कुठे आहे हे सांगायचं झालं तर आजूबाजूला असलेल्या एखाद्या ठिकाणावरुन ते सांगावं लागायचं. पण आता हिच चाळ माझ्या नावाने ओळखली जाणार आहे. हे सगळंच माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे.' असं दत्तू म्हणाला. यासाठी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमचे आभार देखील मानले आहेत.
पुढे तो म्हणाला, 'माझ्यासाठी खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या विभागातील खासकरुन चाळीतल्या लोकांचं माझ्यावर वेगळंच प्रेम आहे. या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन, ज्यांनी आजपर्यंत मला एवढं प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली. या प्रेमामुळे एक वेगळीच उर्जा मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कुटुंबाचे, सोनी मराठी वाहिनीचे मी आभार मानतो,'अशा शब्दात दत्तूने ऋण व्यक्त केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.