an action hero movie
an action hero movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : ॲन ॲक्शन हिरो : गंभीर कोंडीची उपहासात्मक मांडणी

महेश बर्दापूरकर

मनोरंजन विश्‍वाची झगमगती दुनिया आणि सामान्य माणसाच्या जगण्यातील वास्तव याचा काही थेट संबंध असंल, असं आपल्याला वाटत नाही आणि ते अगदी खरं आहे.

मनोरंजन विश्‍वाची झगमगती दुनिया आणि सामान्य माणसाच्या जगण्यातील वास्तव याचा काही थेट संबंध असंल, असं आपल्याला वाटत नाही आणि ते अगदी खरं आहे. मात्र, लेखक-दिग्दर्शक अनिरुद्ध अय्यरनं पदार्पणातच या दोन जगांना एकत्र आणत धमाल उडवून दिली आहे. अनेक ट्विस्ट असलेलं वेगवान व खिळवून ठेवणारं कथानक, प्रत्येक पात्राच्या लिखाणावर घेतलेली मेहनत, अभिनय या आघाड्यांवर चित्रपट दमदार झाला आहे. अळवावरचं पाणी ठरणारी प्रसिद्धी आणि मी म्हणीन तीच पूर्व दिशा हा खाक्या या दोन गोष्टी माणसाला कोणत्या गर्तेत लोटू शकतात याचं नेटकं चित्रण हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य. चित्रपटाला नायिकाच नाही, हेही धाडसच म्हणायचं...

‘ॲन ॲक्शन हिरो’ची कथा आहे मानव (आयुष्यमान खुराणा) या स्टारपदावर पोचलेल्या ॲक्शन हिरोची. हरियानात चित्रण सुरू असताना या स्टारला भेटायला त्याचा एक स्थानिक चाहता येतो; पण मानवला त्याला वेळ देता येत नाही. चिडलेला चाहता चुकीचं पाऊल उचलतो आणि मानवच्या हातून गंभीर चूक घडते. स्टार असूनही मानवला आता लंडनला पळ काढावा लागतो. चाहत्याचा मोठं राजकीय वजन असलेला भाऊ भुरासिंग चौधरी (जयदीप अहलावत) बदला घेण्यासाठी त्याच्या मागावर निघतो. आता उंदीर-मांजराचा जोरदार खेळ सुरू होतो. पोलिस इन्स्पेक्टर रूपकुमार (जितेंद्र हुडा), अक्षयकुमारच्याच भूमिकेतील अक्षयकुमार, अंडरवर्ल्ड डॉन मसूद अब्राहम काटकर (गौतम जोगळेकर) ही पात्रं येत राहतात आणि मानवचा संघर्ष कधी गंभीर, तर कधी उपहासाच्या माध्यमातून पुढं जात राहतो आणि एका मनोरंजक टप्प्यावर संपतो.

चित्रपटाच्या कथेत वेगळेपण आहे आणि मनोरंजन, गुन्हेगारी, राजकीय आणि सामान्य माणसाचं आयुष्य एकत्र आणण्याचा प्रयत्नही वेगळा आहे. कथेतील इन्स्पेक्टर चित्रपटासाठी फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करताना ‘तुम्ही तर सामान्य माणसांसाठी काहीच करत नाही,’ हा टोमणा उपहासाचा परमोच्च बिंदू ठरतो. गुन्ह्यात अडकलेल्या मानवबद्दल अक्षयकुमारचं मत, अंडरवर्ल्ड डॉनची स्वतःला निष्पाप सिद्ध करण्याची धडपड या गोष्टी कथेच्या ओघात येत राहातात आणि तिला समृद्ध करून जातात. मलाईका अरोरा आणि नोरा फतेही आयटम सॉंगपुरत्या गाण्यात येतात, मात्र कथेला नायिका नाही. कथेचा शेवट करताना सेलिब्रिटीच्या जोडीला राजकारण, तपास यंत्रणा आणि गुन्हेगारी विश्‍वाचं एक वेगळंच रूप लोकांसमोर आणण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.

आयुष्यमान खुराणानं स्टारडम आणि पैशाचा शून्य उपयोग असलेल्या स्थितीत अडकलेल्या स्टारची भूमिका मस्त साकारली आहे. पडद्यावर एकाच वेळी दहा गुंडांना लोळवणारा लार्जर दॅन लाइफ इमेज असलेला अभिनेता सामान्य परिस्थितीत अडकल्यावर कसा लढतो हे त्यानं छान साकारलं आहे. जयदीप अहलावतनं पैलवानाचा राजकारणी झालेला आणि आपला बदला निष्ठेनं पूर्ण करणारा भुरासिंग तोऱ्यात उभा केला आहे. इतर कलाकारांनी या दोघांना चांगली साथ दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT