vedat marathe veer daudale saat movie esakal
मनोरंजन

Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर..' चित्रपटातील मावळ्यांची नावंच बदलली, नेसरीकरांचा संताप

प्रसिद्ध मराठी - हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahesh Manjrekar: प्रसिद्ध मराठी - हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे. आता तर कोल्हापूरातील नेसरीकरांनी त्यावरुन संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांवरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेऊन मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक चित्रपटांवरुन निर्माते आणि दिग्दर्शक यांना फटकारले होते. त्यांनी यापुढील काळात ऐतिहासिक चित्रपट तयार करताना भान ठेवणे गरजेचे आहे. त्यात जर ऐतिहासिक घडामोडींची मोडतोड करण्यात आली असल्यास गाठ माझ्याशी आहे. अशा शब्दांत संभाजीराजेंनी इशारा दिला आहे. अशातच नेसरीकरांनी देखील वीर मराठेमध्ये त्या सात वीरांची नावचं बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा-कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

कोल्हापुरामध्ये वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जी नावं बदलण्यात आली आहे त्यात दुरुस्ती होणं आवश्यक आहे. तसे न झाल्यास आम्हाला आक्रमक व्हावं लागेल. असा इशारा नेसरीकरांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी प्रतारणा केली जात आहे. त्याची मोडतोड होते आहे. निर्माते आणि दिग्दर्शक हे मनोरंजनाच्या नावाखाली काय करत आहे हे त्यांनाच कळत नाही. मात्र त्यामुळे वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात जातो आहे. ते चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया नेसरीकरांनी दिली आहे.

येत्या काळात त्या चित्रपटामध्ये ती सात नाव ज्या क्रमानं आहेत त्याच क्रमानं दिसली पाहिजेत. अन्यथा आम्ही आंदोलन करुन आक्रमकपणा दाखवून देऊ. ते चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. असा थेट इशाराही यावेळी नेसरीकरांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: विदर्भात आज रेड अलर्ट; मुसळधारेसह अतिवृष्टीही शक्यता, प्रशासन सतर्क, कसे असेल हवामान? जाणून घ्या

Panchang 25 July 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे

आजचे राशिभविष्य - 25 जुलै 2025

सोलापूर शहरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पोलिसांची गस्त! ६ महिन्यांत चोरट्यांनी फोडली सोलापुरातील ५१ घरे; चोरीच्या २७३ घटनांचीही नोंद

अग्रलेख : बिहारी ‘ओळख परेड’

SCROLL FOR NEXT