Malaika Arora News esakal
मनोरंजन

Malaika Arora : 'लोकांना वाटलं घटस्फोटानंतर अरबाजकडून खूप सारे पैसे मिळाले, पण...' ७ वर्षानंतर मलायकानं काय सांगितलं?

मलायकानं (Malaika Arora Viral Interview) त्या मुलाखतीतून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत...

युगंधर ताजणे

Malaika Arora Actress interview : बॉलीवूडची प्रसिद्ध सेलिब्रेटी मलायका ही नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. वयाची चाळीशी केव्हाच पार केलेल्या मलायकाच्या सौंदर्याची जादू काही केल्या कमी होत नाही.तिनं तिच्या फोटों अन् व्हिडिओनं चाहत्यांना भुरळ पाडल्याचे दिसून आले आहे. आता मलायका एका वेगळ्याच बातमीमुळे चर्चेत आली आहे.

मलायकाच्या आयुष्यावर आधारित एक माहितीपटही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.मुव्हिंग विथ मलायका असे त्या माहितीपटाचे नाव होते. त्याला फार काही प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र त्यातून तिनं त्याचा बॉलीवूडमधील प्रवास, त्यासाठीचा तिचा संघर्ष आणि तिचं वैयक्तिक आय़ुष्य याविषयी काही माहिती चाहत्यांना शेयर केली होती. मलायका ही सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपुरसोबत रिलेशशिपमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

मलायका अन् अरबाजचा बऱ्याच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. या सगळ्यात तेव्हापासून मलायकाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिनं अरबाजकडून घटस्फोट घेताना त्याच्याकडून खूप पैसे पोटगी म्हणून घेतले असतील. असे मलायकाबाबत बोलले जायचे. तब्बल सात वर्षानंतर मलायकानं जो खुलासा केला आहे त्यातून तिनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

मलायका अन् अरबाज यांच्या १९ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला काही कारणास्तव ग्रहण लागले होते. दोघांनी संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या घटस्फोटानं बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. २०१७ मध्ये अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाला होता. मलायकाही साधारण २००० च्या दरम्यान अरबाजच्या प्रेमात पडली होती. एका मुलाखतीमध्ये मलायकाला तिच्या घटस्फोटाविषयी वेगळीच माहिती कळली होती.

लोकांना असे वाटते की, मी जेव्हा अरबाजकडून घटस्फोट घेतला तेव्हा मला खूप सारे पैसे पोटगी म्हणून मिळाले. हे लोकांना कुठून आणि कसं कळतं हेच मला कळत नाही. पिंकव्हिलाला दिलेली ती मुलाखत आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. मी कधीही माझ्या कुटूंबावर पैशासांठी दवाब आणला नाही. तसेच मी कधीही पैशांसाठी कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही.

मला लग्नासाठी कुणी फोर्स केलेला नव्हता. मी माझ्या मनानं काही निर्णय घेतले होते.त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही होते आहे त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज होती. ती जबाबदारीही मी घ्यायला हवी. अशा शब्दांत मलायकानं तिची भूमिका मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं, कुचक्या कानाचं; मनोज जरांगेंची खोच टीका

Lover Killed Girl : सोशल मीडियावर महिन्याची ओळख, प्रियकराला भेटल्यानंतर तीचा खून केला अन् आंबा घाटात फेकला मृतदेह पण एक चूक...

टीम पॅराडाईजने घेतले मोठे पाऊल, हॉलिवूड सहयोगाद्वारे जागतिक प्रदर्शनीसाठी केली तयारी

Latest Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली

Solapur Ashtavinayak Temples: सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेली ही मंदिरे कुठे आहेत

SCROLL FOR NEXT