malaika-arora
malaika-arora 
मनोरंजन

मलायका अरोराचा "छैंय्या छैंय्या' 

सकाळ वृत्तसेवा

"डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स' या गुणवत्ता शोध कार्यक्रमातील 11 स्पर्धकांनी अप्रतिम कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविला आहे. यात अभिनेत्री करीना कपूर-खान, बॉस्को मार्टिस व रॅपर रफ्तार हे परीक्षक आहेत. त्यातच सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिपण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. या आठवड्यात अभिनेत्री मलायका अरोरा ही करीनाऐवजी परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. यात ती "छैंय्या छैंय्या' या गाण्याच्या आठवणींना उजाळा देणार आहे. 

याबाबत मलायका म्हणाली, ""कोणीही कधीही "छैंय्या छैंय्या' हे गाणे गायले, की मी जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. या गाण्याचे चित्रीकरण कसे केले तिथपासून ते मी किती वेळा ट्रेनच्या छतावर पडले होते तिथपर्यंत सर्व गोष्टी आठवतात. हे गाणे मी कधीच विसरणार नाही. कारण, मोठ्या पडद्यावर एका गाण्यावर मी प्रथमच नृत्य केले होते. त्या वेळी तिथे शाहरुख खान, मणिरत्नम, संतोष सिवन यांसारखे सुपर स्टार होते. त्या सर्वांनी इतके प्रेम केले, की मला कुटुंबीयांची आठवण आली नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT