Malaika Arora talks about her life decisions and ex-husband Arbaaz Khan: said ‘I have moved on..’ sakal
मनोरंजन

Malaika Arora: मी पुढे गेले.. माझा एक्स पुढे गेला.. पण तुम्ही.. मलायकानं ट्रॉलर्सची केली..

"मूव्हिंग इन विथ मलायका " शोमधून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर..

सकाळ डिजिटल टीम

malaika arora : बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा तिच्या अभिनया पेक्षा नात्यामुळे जास्त चर्चेत असते. मध्यंतरी ती प्रेग्नंट असल्याच्या अफवेने सर्वांनाच धक्का दिला होता, त्यानंतर अर्जुन कपूरने या खोट्या बातमीवर संताप व्यक्त केला. मलायका सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमुळे चर्चेत आहे. या शो मध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे.

(Malaika Arora talks about her life decisions and ex-husband Arbaaz Khan: said ‘I have moved on..’)

या शोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे . या व्हिडिओमध्ये मलायका रडताना दिसत होती. या क्लिपमध्ये मलायका तिचा एक्स पती अरबाज खानबद्दल बोलताना दिसत आहे. तिची मैत्रिण आणि चित्रपट निर्माती फराह खानसोबत तिच्या आयुष्याबद्दल चर्चा करताना तिला अश्रू अनावर झाले.

मलायका म्हणते, "मी माझ्या आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय पूर्णपणे योग्य आहे. माझे जीवन कोणाबरोबर जगायचे आहे हे मला माहीत आहे, आणि मला त्याचा आनंद आहे." फराहला हे सांगताना मलायका रडली. फराहने तिला दिलासा दिला आणि म्हणाली, "अरे, तू रडत असतानाही सुंदर दिसतेस." शेवटी, मलायका एका स्टेजवर उभी असलेली दिसली. तिच्या हातात माईक आहे आणि म्हणते "मी पुढे गेले आहे, माझा एक्स पुढे गेला आहे, तर तुम्ही सर्व केव्हा पुढे जाणार?" अस बोलून मलायकाने ट्रॉलर्स सडेतोड उत्तर दिले आहे.

मलायकाची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री करीना कपूर खान हि देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. करिनाने मलायकाचे तिच्या या शो बद्दल कौतुक केले आहे आणि तीला सपोर्ट केला आहे. "एक मैत्रिण म्हणून मला वाटते की ती रॉक सॉलिड, सुपर हॉट आणि सुपरमॉडेल आहे," असे करीना म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT