FEK.jpg
FEK.jpg 
मनोरंजन

फक्त शर्ट घालून बाहेर पडली 'ही' अभिनेत्री, युजर्सनी विचारलं...

वृत्तसंस्था


मुंबई : आपल्या बोल्ड लुक आणि धमाकेदार डान्समुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा होय. ती आपल्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच कायम चर्चेत असते. सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

 दरम्यान, कधी अर्जुन कपूरसोबतचं नातं तर कधी बोल्ड फोटोशूट. पण सध्या मलायकाच्या नावाची चर्चा होतेय तिच्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे. मलायका अनेकदा बोल्ड अवातारात दिसते पण यावेळी तिनं जो शर्ट ड्रेस घालून आउटिंगसाठी निघाली त्यामुळे मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायकाच्या या फोटोवर नकारात्मक कमेंट पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, मलायका अरोराचे हे फोटो मानव मंगलानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. मलायका संडे डिनरनंतर तिच्या बहिणीच्या घराबाहेर स्पॉट झाली त्यावेळी तिनं व्हाइट कलरचा शर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसवर तिनं हाय शूज घातले होते तर डोक्यावर हॅट घेतली होती. पण मलायकाचा हा लुक चाहत्यांचा मात्र पसंतीत उतरला नाही आणि आता यावरुनच मलायकाला ट्रोल केलं जात आहे.

एका युजरनं लिहिलं, ही नेहमी पॅन्ट घालायला का विसरते. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिचं वाढतं वय लक्षात येतं. याशिवाय आणखी एका युजरनं लिहिलं, मलायकाचे पहिले आणि आत्ताचे फोटो पाहिल्यावर लक्षात येत की तिच्यात किती बदल झाला आहे. तर एका युजरनं तर चक्क तिला वयाचा विचार करुनच कपडे घालत जा असा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मलायकानं रेड ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केल होतं. यावेळी ती तिची बहिण अमृता अरोरासोबत दिसली होती. तिच्या या लुकचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. मलायकाच्या खासगी जीवनाबद्दल बोलायचं तर तिनं तिच्या 46 व्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर झालेल्या प्रत्येक मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल दिलखुलासपणे बोलत  आहेत.
      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT