Manasi Naik buy new home and making puri with cute smile viral video sakal
मनोरंजन

Manasi Naik: पाहूनच पोट भरलं राव! साखरेवानी गोड हसत मानसी लाटतेय पुऱ्या.. व्हिडिओ व्हायरल..

अभिनेत्री मानसी नाईकचा व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Manasi Naik making puri with cute smile : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत. मानसी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे.

मानसीला खरी ओळख मिळाली ते 'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे. तिचे हे गाणे भन्नाट गाजले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मानसी नाईक आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.

सध्या मानसी नाईक आपल्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिनं घटस्फोट घेतला असून ती विभक्त झाली आहे. पण असे असतानाही मानसी विविध कामातून कायमच स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर नवे घर खरेदी केले आहे. याच घरातील एक खास व्हिडिओ मानसीने शेयर केला आहे. जो सध्या तूफान व्हायरल होत आहे.

(Manasi Naik buy new home and making puri with cute smile viral video)

मानसीने सोशल मीडियावर पोस्ट करत नुकतीच एक आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. मानसीने आपल्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. नुकतच तिने या नव्या घरात गृहप्रवेश केला. अत्यंत पारंपरिक पद्धतीने तिने पूजा घालून नव्या घरात प्रवेश केला. यावेळी तिने आलेल्या पाहुण्यांसाठी खास बेत ही केला होता.

मानसीने जेवणासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत केला होता. पण झाले असे की मानसीने केलेला बेत खाण्याच्या आधीच तुमचं पोट भरेल. आता तुम्ही म्हणाल न खाता पोट कसं भरेल.. तर ते तुम्हाला मानसीचा व्हिडिओ पाहूनच कळेल.

मानसीने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती गोल गरगरीत पुऱ्या लाटताना दिसत आहे. पण यावेळी पुऱ्या लाटताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे. ती इतकं गोड हसत आहे की पाहून सर्वांच्या नजारा तिच्यावर खिळल्या आहेत.

पुऱ्या करतानाच ती गोड हसते. सोबत तिने एक कॅप्शन ही दिले आहे. ''मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं कधी कधी मुली तुमच्याकडे बघून पण हसतात.. '' असं भन्नाट कॅप्शन तिने दिलं आहे.

या व्हिडिओ वर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला असून मानसीचे तोंड भरून कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या हसण्यावर फिदा झाल्याची कबुलीही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : कामठी निवडणुकीत बोगस मतदार प्रकरणामुळे खळबळ

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...

SCROLL FOR NEXT