Manoj Bajpayee Will contest 2024 Lok Sabha elections from Bihar?  SAKAL
मनोरंजन

Manoj Bajpayee: लोकसभा २०२४ ची निवडणुक बिहारमधून लढवणार? चर्चांवर मनोज वाजपेयींनी सोडलं मौन

मनोज वाजपेयींनी लोकसभा निवडणुक लढवणार की नाही यावर मौन सोडलंय

Devendra Jadhav

Manoj Bajpayee News: 2024 ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे अनेक स्टार्स राजकारणात येणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, या बातम्यांवर स्टार्सनी आपलं वक्तव्य केलं असून या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता अभिनेता मनोज वाजपेयी राजकारणात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया काय म्हणाले तो?

अभिनेता मनोज वाजपेयीने राजकारणात येण्याच्या बातमीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने X वर लिहिले की, "ठीक आहे मला सांगा हे कोणी बोलले किंवा काल रात्री तुम्हाला स्वप्न पडले? बोला बोला!

त्यामुळे या बातम्या केवळ अफवा असून मनोज राजकारणात उतरत नसल्याचे त्याच्या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे. आता युजर्ससुद्धा यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

काय होतं प्रकरण?

खरं तर, X वर एका न्यूज पोर्टलने ट्विट केले की, "अभिनेता मनोज वाजपेयी पश्चिम चंपारणमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत."

हे ट्विट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. आता या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्याने त्याच्या ट्विटरवर पोस्ट करुन या सर्व चर्चा थांबवल्या आहेत.

याआधी कोणत्या स्टार्सची नावे समोर आली होती

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि माधुरी दीक्षित या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. न्यूज 18 च्या वृत्तानुसार अभिनेत्री कंगना रणौतच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या राजकारणात प्रवेश केल्याची पुष्टी केली असली, तरी माधुरी दीक्षितने या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT