मनोरंजन

...तर अनुदान बंद

सकाळवृत्तसेवा

अभिनेते, लेखक आणि नाट्यवतुर्ळात विविधांगी भूमिका साकारत मनोरंजन क्षेत्रातील नवोदितांना बहुमोल मार्गदर्शन करणारे प्रवीण तरडे. ज्यांची बोलण्याची शैलीही तितकीच प्रसिद्ध आहे... यांच्यासोबत रंगलेलं रॅपिड फायर...
तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता?
- सूर्यनमस्काराने करतो आणि प्रोटिन घेऊन दिवसाची सुरुवात होते. 

तुमचा फिटनेस फंडा काय आहे?
- मी रोज दीड तास जिममध्ये व्यायाम करतो. मिस्टर इंडिया असलेले महेश हगवणे हे व्यायाम घेतात आणि ते कटाक्षाने पाळतो. 

आवडीचे पेय?
- प्रोटिन आणि ताक. 

तुम्ही कोणत्या कॉलेजला होता? अविस्मरणीय आठवण?
- मी भारती विद्यापीठात शिकलो. एमबीए केलं, मग आय.एल.एस.मधून पदवी घेतली. त्या वेळी १९९९ मध्ये पुरुषोत्तम जिंकलो होतो.

अभिनय क्षेत्रातील आदर्श कोण?
- अमिताभ बच्चन. 

अभिनेता झाला नसता तर कोण व्हायला आवडलं असतं?
- मी पोलिस विभागात गेलो असतो. 

छंद कोणते?
- ट्रेकिंग आणि क्रिकेट. 

आवडतं भटकंतीचं ठिकाण?
- सिंगापूर. 
 

अभिनय क्षेत्रात तुम्हाला बदल करायची संधी मिळाली तर काय कराल?
- पुरुषोत्तम करंडकला राष्ट्रीय पातळीवर आणेन आणि मराठी चित्रपटांना जे अनुदान दिलं जातं ते बंद करून टाकीन हे नक्की. 

नवीन प्रोजेक्‍ट्‌स?
- ‘मुळशी पॅटर्न’ हा पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित सिनेमा करतो आहे. 

या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदितांना काय संदेश देशील?
- निर्व्यसनी राहा आणि शरीर सांभाळा. मेहनत करा, त्याशिवाय पर्याय नाही. 

शब्दांकन - तन्मयी मेहेंदळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: अजय-अतुलच्या 'वाजले की बारा' गाण्यावर धकधक गर्ल माधुरीचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT