मनोरंजन

'मायबाप आहात ना, मग पोसायला‌ थोडं सोसा की': अभिनेता आस्तादची खंत

देशातल्या इतर राज्यांमध्ये थिएटर आणि नाट्यगृहे सुरु झाली असताना अजून महाराष्ट्रात ती बंद का आहेत, असा सवाल काही कलाकारांनी सोशल मीडियावर विचारण्यास सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

देशातल्या इतर राज्यांमध्ये थिएटर आणि नाट्यगृहे सुरु झाली असताना अजून महाराष्ट्रात ती बंद का आहेत, असा सवाल काही कलाकारांनी सोशल मीडियावर विचारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाट्य कलाकार आपल्या मागणीवर ठाम असून त्यासाठी त्यांनी अनेकदा शासन दरबारी आपले गाऱ्हाणं मांडलं आहे. मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. अशावेळी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या आधारे आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आस्ताद काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रियेनं सोशल मी़डियावर वाचकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आस्ताद (Aastad Kale ) यांनी फेसबूकवर पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांनाच नको आहे का, असा प्रश्न पडतो आहे. तसे जर नसेल तर मग प्रेक्षकांनी देखील आमच्या बरोबर शासनाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. प्रेक्षकांनो तुम्ही आवाज उठवण्यात मदत करा. मायबाप म्हणत आलेत ना तुम्हाला, मग पोसायला‌ थोडं सोसा की. या शब्दांत आस्ताद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील व्टिट करुन सरकारच्या धोरणांविरोधात टीका केल्याचे दिसून आले आहे. राज्यात सांस्कृतिक खातं आहे की नाही, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांच्या शिष्टमंडळानं शासनाच्या दरबारी थिएटर सुरु करण्यासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ते निवेदन स्वीकारताना रंगभूमी दिनाच्या निमित्तानं थिटएर सुरु करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता सणाच्या निमित्तानं कोरोनाचे नियम आणखी कडक होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशावेळी त्याचा परिणाम पुन्हा सांस्कृतिक विश्वावर होईल. अशी भीती कलाकारांना आहे. आस्ताद काळे यांच्या पोस्टला काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर काहींनी त्यांना उलट प्रश्न करत मदत का करावी असेही प्रश्न केले आहेत. त्यावर कलाकरानं चाहत्यांना मनोरंजन विश्वातील सगळ्या कलाकारांचा विचार करुन आपण मदत करावी. असे आवाहन केले आहे. थिएटर चालकांना अजूनही थिएटर सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी मिळावी म्हणून यापूर्वी अनेकदा कलाकारांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे. मात्र निवेदनं घेऊनही त्यावर कोणताच विचार झालेला नाही. असं दिसून आलं आहे. त्यामुळे येत्या काळात कलाकार मंडळी आक्रमक पवित्रा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात अजूनही सौम्य पद्धतीनं सरकारला विनंती करण्याचं काम सुरु असल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT