anshuman vichare daughter 
मनोरंजन

"आई, मी तुला म्हातारी होऊच देणार नाही"; अंशुमन विचारेच्या मुलीचा क्युट व्हिडीओ व्हायरल

स्वाती वेमूल

अभिनेता अंशुमन विचारे सोशल मीडियावर त्याची मुलगी अन्वीचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. चिमुरड्या अन्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिच्या आईसोबत गप्पा मारत असून तिचा निरागसपणा नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओच्या शेवटी ती तिच्या आईला म्हणते, मी तुला म्हातारी होऊच देणार नाही. तिचं हेच वाक्य नेटकऱ्यांच्या मनाला भावलं असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आईला कामात मदत करण्यासाठी ती जेवण बनवायला सुरुवात करते आणि त्यासोबतच ती गप्पा मारत असते. अन्वीची आई तिला विचारते, मी म्हातारी झाल्यावर तू मला सांभाळशील ना? त्यावर अन्वी तिला म्हणते, "तू म्हातारी होणार मग मी तुला घाबरणार. पण मी तुला म्हातारी होऊच देणार नाही. कारण तू माझी मम्मी आहेस." अन्वीचा हाच निरागस संवाद नेटकऱ्यांना आवडला आहे. 

शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातूनही अंशुमन त्याच्या कुटुंबीयांसाठी वेळ काढतो. शूटिंगमधून लवकर किंवा रात्री घरी परतला की तो मुलीला आणि पत्नीला गाडीतून फिरवून आणतो. शनिवारी कधी वेळ मिळाला, की तो कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला जातो. तर रविवारी सकाळचा चहा आणि नाश्ता बनवण्याची जबाबदारी अंशुमनचीच असते. 

अंशुमनच्या चिमुकल्या अन्वीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिच्या व्हिडीओला सोशल मीडियावर असंख्य लाइक्स व कमेंट्स मिळतात. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अंशुमन जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच त्याच्या मुलीची लोकप्रियता आहे. एकांकिकांमधून घडलेल्या अंशुमनने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. 'श्वास', 'पोश्टर बॉईज', 'विठ्ठला शपथ' यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT