marathi actress ashvini mahangade special post after she visit jejuri khandoba temple SAKAL
मनोरंजन

Ashvini Mahangade: "अखेर देवाने गडावर बोलावलं.." जेजुरीला गेलेल्या अश्विनीचा भारावून टाकणारा अनुभव वाचा

अश्विनी जेजुरी गडावर गेली असून तिने तिचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

Ashvini Mahangade visit Jejuri Khandoba Temple: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अश्विनीला आपण कायमच विविध माध्यमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अश्विनी सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

अशातच अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अश्विनी जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला गेलेली दिसतेय. अश्विनीने सोशल मीडियावर खंडोबा दर्शनाचा भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय.

अश्विनीचा जेजूरी दर्शनाचा भारावून टाकणारा अनुभव

अश्विनीने जेजुरी दर्शनासाठीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. हा व्हिडीओ पोस्ट करुन अश्विनी लिहीते, "यळकोट यळकोट जय मल्हार.... सदानंदाचा येळकोट अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं.. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले, गेल्या वर्षी #मन_मंदिरा_गजर_भक्तीचा चे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले पण गडावर दर्शनासाठी जाणे झालेच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचे की देवाने अजून बोलावणे केलेच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार?
आणि देवांनी सांगावा धाडला.. दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण."

अश्विनीचं वर्कफ्रंट...

अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... अश्विनी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारतेय. याशिवाय ती लवकरच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई सिनेमाचं सध्या शुटींग सुरु असून अश्विनी या सिनेमात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

SCROLL FOR NEXT