marathi actress prajakta mali visit parli vaijnath temple photo post on instagram visiting 12 jyotirlingas Esakal
मनोरंजन

"आजपासुन सुरूवात करतेय", परळी वैजनाथसमोर नतमस्तक होऊन प्राजक्ताने केलाय अनोखा संकल्प

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Vaishali Patil

Prajakta mali visit parli vaijnath temple: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्त माळी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असेत. प्राजक्ताने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता आजवर अनेक भुमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मग ते मालिका असो सिनेमा असो किंवा चित्रपट प्राजक्ता नेहमी अभिनयानं चाहत्यांची मने जिंकतेच.

सोशल मिडीयावर सक्रिय असलेल्या प्राजक्ताने आता एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामुळे तिची सध्या चर्चा रंगली आहे. प्राजक्ताने एक नवीन अनोखा संकल्प केला आहे. या पोस्टमधुन तिने याबाबत चाहत्यांना माहीती दिली आहे.

खरतर प्राजक्ता भगवान महादेवाच्या भक्तीत लीन झाली आहे. ती महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आणि आरती करताना या फोटोमध्ये दिसत आहे. प्राजक्ताने हे फोटो शेयर करत एक कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने तिच्या संकल्पाबद्दल सांगितलं आहे. यात प्राजक्ता लिहिते की,

चिदानंद रूपा “शिवोऽहम् शिवोऽहम्”….

आजच्या सोमवारी संकल्प सोडला..

येत्या वर्षात “१२ ज्योतिर्लिंग यात्रा” करणार.

आज सुरूवात झाली - “महाराष्ट्रातल्या - परळी वैजनाथ” पासून.

(ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता, पण कामाच्या commitments मध्ये ते शक्य नाही. आपणांस तसे जमत असेल तर जरूर करावे. एकसंधपणे यात्रा करणे इष्ट.)"यासोबतच प्राजक्ताने #महादेव #साधक #शिवभक्त असे हॅशटॅग वापरले आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर प्राजक्ताने १२ ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची सुरुवात तिने आजपासून केली आहे. तिने महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथ मंदिरात देवाचे दर्शन घेतले आणि तिच्या या यात्रेस आरंभ केला आहे.

आता तिची ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला तिच्या यात्रेसाठी खुप शुभेच्छा दिल्या आहेत. जिथे कलाकार परदेशी फिरण्याचा विचार करतात तिथे प्राजक्ता भक्तीत लीन होऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा निर्णय घेते असं म्हणत नेटकरी तिचं कौतुक करत आहे.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्या हातात अनेक प्रोजेक्ट आहे. ती शेवटची हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटात दिसली होती.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही या चित्रपटात प्राजक्ता व्यतिरिक्त वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे हे कलाकारदेखील दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT