marathi actress sakshi gandhi post viral on instagram with family sahkutumb sahparivaar SAKAL
मनोरंजन

Sakshi Gandhi: "मी चिपळूण सोडून मुंबईत आले अन्...." 'सहकुटुंब सहपरिवार' अभिनेत्रीने सांगितली मनातली खंत

साक्षी गांधीने सोशल मीडियावर पोस्ट करुन मनातली खदखद सांगितली आहे

Devendra Jadhav

Sakshi Gandhi Sahkutumb Sahparivaar News: "मी चिपळूण सोडून मुंबईत आले अन्...." 'सहकुटुंब सहपरिवार' अभिनेत्रीने सांगितली मनातली खंत सहकुटुंब सहपरिवार ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका. काही महिन्यांपुर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना लोकांचं प्रेम मिळालं. या मालिकेत अवनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री साक्षी गांधीचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे. साक्षी गेली अनेक वर्ष मराठी मालिकाविश्वात तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. अशातच साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या मनातली खंत व्यक्त केलीय.

साक्षीने सोशल मीडियावर आई - बाबांसोबतचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, "मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात .. आपल्या family पासून दूर राहतात .. महिनोंमहिने भेट नाही , पाहणं नाही .. फक्त काय ते call वर आवाज ऐकणं ..
७ वर्ष झाली चिपळूण सोडून मुंबईत आले .. घरच्यांपासून दूर ..
खूप मोठ्ठ व्हायचं असतं , पैसे कमवायचे असतात , सगळ्या ईच्छा पूर्ण करायच्या असतात .. का ???? तर आयुष्यात setlled व्हायचंय .. निवांत व्हायचं आहे .. पण खरचं आपण होतो का कधी पूर्णपणे settled …???????"

साक्षी पुढे लिहीते, "कामासाठी इतके धावत आपण असतो की अनेक दिवस एखादा २ मिनिटांचा कॉल सुद्धा घरी होत नाही ..
नसेल का होत आई वडिलांच्या जिवाची घालमेल ??? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का ? एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का त्यांच्या घशाखाली ???
कधीतरी त्रास होतो या विचारानी .. पण सहज उठून जाताही येत नाही … तेंव्हा भासते घराची ओढ …
आई पप्पा क्षितू …खूप दिवस झाले पाहिलं नाहीये तुम्हाला ….. पण भेटू लवकरच ( घरच्यांना सुद्धा भेटू लवकरच .. हे म्हणावं लागतंय )"

साक्षी सध्या नवी जन्मेन मी मालिकेत अभिनय करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT