tejaswini pandit  social media
मनोरंजन

तेजस्विनी पंडितने मागितली चाहत्यांची माफी

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर याबद्दल विचारणा केली होती.

स्वाती वेमूल

अभिनेत्री तेजस्विनी पंडित Tejaswini Pandit नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक संदेश देते. गेल्या तीन वर्षांपासून नवरात्रौत्सवात ती वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमांतून नारीशक्तीचा आविष्कार घडवत आहे. मात्र यंदाच्या वर्षी तिला ते शक्य झालं नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली.

तेजस्विनीची पोस्ट-

'नमस्कार! कसे आहात ? सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार आणि माफीसुद्धा! आभार तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल की गेल्या ३ वर्षांप्रमाणे याही वर्षी मी नवरात्रीनिमित्त खास फोटो, संदेशांच्या माध्यमाने तुम्हाला भेटायला येईन, आणि माफी यासाठी की ते या वर्षी शक्य झालं नाही. दोन दिवस आधीपासूनच तुमचे असंख्य मेसेजस मला मिळत होते आणि कुठेतरी मनाला सुखावतही होते, आजच्या क्षणार्धात बदलणाऱ्या जगात तुम्ही माझ्या कलाकृतींची नोंद ठेवलीत हा माझा बहुमान आहे.

पण तरीही या वर्षी मी कोणतीच संकल्पना साकारली नाही. अर्थात याची अनेक कारणे देखील आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझा नवनिर्मितीचा ध्यास. माझ्या प्रॉडक्शन हाऊसकडून तुमच्यासाठी दर्जेदार कलाकृती घेऊन लवकरच येते आहे आणि विश्वास ठेवा हे अजिबात सोपं काम नाही. असं म्हणतात कोणतीच गोष्ट अर्ध्या मनाने करू नये, आणि रसिक प्रेक्षकांसाठी तर नाहीच नाही. म्हणूनच या वर्षी जरा थांबण्याचा निर्णय घेतला.

पण लक्षात घ्या हा पूर्णविराम नाही, अर्धविराम आहे आणि अर्धविराम पुढील वाक्याचा अर्थ अजून वाढवतो. तेव्हा पुढच्या वर्षी अजून दमदार संकल्पनेसह तन, मन, धन अर्पून तुमच्या समोर येईन. या वर्षी माझी संकल्पना जरी तुमच्यासमोर आली नसली तरी माझ्या अनेक चाहते, अनुयायी, सहरंगकर्मींनी प्रेरणेची ही मशाल पुढे धगधगत ठेवली आहे आणि याचा मला मनापासून आनंद आहे. तेव्हा पुन्हा एकदा आभार आणि माफी पुन्हा एकदा! आणि ठाम विश्वास की हो पुढच्या वर्षी नक्कीच भेटू,' अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'पोस्टची सकाळपासून फार वाट बघत होतो. पण काही हरकत नाही, पुढच्या वर्षीसुद्धा अशीच वाट बघू,' असं एकाने लिहिलं. तर 'माझा न दिसणाऱ्या देवावर विश्वास नाही पण नवरात्रीमध्ये तुमचे फोटो येतात आणि तेव्हा वाटतं देव किंवा देवी कदाचित असेच दिसत असतील. खूप वाट पाहत होतो आदिशक्तीच्या त्या रूपांची, पण काही हरकत नाही,' असं दुसऱ्याने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT