balewadi
balewadi 
मनोरंजन

मराठी चित्रपटासाठी बालेवाडीचं स्टेडियम बुक

सकाळ डिजिटल टीम

पुणे: विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं शिवछत्रपती स्टेडियम आता चित्रपटांसाठीही सातत्यानं वापरलं जाऊ लागलं आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं चित्रीकरण बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बहुधा, या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटाचं प्रथमच बालेवाडी स्टेडियममध्ये चित्रीकरण करण्यात आलं आहे. 

हा चित्रपट अॅथलेटिक्सवर आधारित आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या शेड्यूलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यात आलं. या निमित्तानं स्टेडियममध्ये स्पर्धेसारखीच लगबग झाली होती. बालेवाडी स्टेडियममध्ये यापूर्वी 'दंगल'सारख्या अनेक चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.

'राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक हवा होता. महाराष्ट्रीत नाशिक, रत्नागिरी आणि पुणे याच ठिकाणी ही सुविधा आहे. नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता चित्रीकरणासाठी महत्त्वाची होती. या स्टेडियममध्ये चित्रीकरणाचा अनुभव फार कमाल होता,' असं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी यांनी सांगितलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT