Marathi Drama, Toh mee nhavech...completed 60years Google
मनोरंजन

'हे नाटक प्रचंड कमवेल, मात्र भांडणं होतील'; 'तो मी नव्हेच' नाटकाची मांडली गेली होती कुंडली...

८ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्ली येथील आयफेक्स थिएटर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. आज या नाटकाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत

सकाळ डिजिटल टीम

Marathi Drama: "तो मी नव्हेच" नाटक म्हणजे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक स्मरणीय ठेवा . हे नाटक आर्चाय अत्रे यांनी लिहले होते आज या नाटकाला ६०वर्षे पूर्ण झाले आहेत. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्ली येथील आयफेंक्स थिएटर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकाने तब्बल २८०० प्रयोगाचा टप्पा पार केला . प्रभाकर पणशीकरांच्या(Prabhakar Panshikar) पंचरंगी भूमिकेने अख्ख्या महाराष्ट्राला झपाटुन टाकले . इतिहास घडवणारं हे नाटक आज हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.(Marathi Drama, Toh mee nhavech...completed 60years)

हे नाटक खेडोपाडीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं अन् शेकडो कलावंतांना रोजगार मिळाला. १९६१ नंतर मराठी नाटकांना आलेली मरगळ झटकली गेली ती याच नाटकामुळे. आजही हे नाटक पाहिलेले रसिक प्रेक्षक आपल्याला या नाटकाची क्रेझ किती होती ते सांगतील. पंत (प्रभाकर पणशीकर) रंगभूमीवर आल्यावर काय जादू करतात हे रसिक मायबाप सांगत असताना त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांचे डोळेच अधिक बोलत असतात.

हे फार कमी लोकांना माहीत आहे की, अत्रे यांची या नाटकासाठी प्रभाकर पणशीकर हे कधीच पहिली पसंती नव्हते. अत्रे यांनी नाटकाची एकही तालीम पाहिली नव्हती. ‘कोण हा पणशीकर घेतला आहे’, असं ते म्हणे रांगणेकरांवर ओरडलेही होते. मात्र, प्रभाकरच मुख्य भूमिका करेल, यावर रांगणेकर ठाम राहिले. ठरल्याप्रमाणे दिल्लीत पहिला प्रयोग झाला. पणशीकरांची पंचरंगी भूमिका ही नाट्य इतिहासात मैलाचा दगड ठरली.

‘तो मी नव्हेच’ या नाटकाची तत्कालीन प्रसिद्ध ज्योतिषाचार्य कै. रावत यांनी कुंडली मांडून भविष्य वर्तवले; ‘हे नाटक प्रचंड लोकप्रिय होऊन तुफान धंदा करील!’ मात्र, ‘याच नाटकामुळे भांडणे होतील!’ अशी धोक्याची घंटा वाजवून, शिवाय विजयादशमीच्या दसऱ्याचा मुहूर्तही काढून दिला! ते भविष्य अक्षरशः खरे ठरले. पुढील ४०-४५ वर्षांत लेखक, निर्माते, अभिनेते यांच्यात दुरावा येऊनही, मराठी रंगभूमीवरील ते एकमेव व एकमेवद्वितीयही ठरले.

खर तर हे नाटक माधव काझी या मूळ आरोपीने बचाव पक्षाचा वकील न घेता स्वतः ही केस चालवली होती यावर बेतलेलं होतं. फौजदारी कायद्यात तपासणी, उलटतपासणी यांना खूप महत्त्व असते. या केसचे सुमारे दोनशे पानांचे निकालपत्र होते. ते आचार्य अत्रे यांनी अतिशय बारकाईने वाचले. त्यातली वृत्तपत्रांत येणारी खटल्यासंदर्भातील कात्रणे 'मराठा'च्या प्रतिनिधींकडून मागवून घेतली. नाटक हळूहळू त्यांच्या लेखणीद्वारे कागदावर उतरू लागले. निकाल देण्याआधी कायद्याप्रमाणे न्यायाधीश हा आरोपीला ‘तुम्हाला काही म्हणायचे आहे काय?’ असे विचारतो म्हणजे आरोपीला त्याच्या बचावाची (डिफेन्स) संधी देतो. तेव्हा निकालपत्र लिहिताना आरोपीचा बचाव हा निव्वळ ‘डिफेन्स ऑफ डिनायल्स’ म्हणजे ‘मला माहीत नाही’, ‘मी केलेच नाही’, ‘मी तो नाहीच’ असेच पालुपद लावले होते आणि त्यावरून एका अजरामर कलाकृतीने जन्म घेतला ‘तो मी नव्हेच!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: तासगांव तालुक्यातील पेड गावात बिबट्या कोंबड्या खायला गेला आणि खुराड्यात अडकला

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT