mulgi zali ho
mulgi zali ho 
मनोरंजन

लाडानं 'म्हातारे' म्हणायचो,पण... किरण माने कुणाबद्दल बोलले?

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane Reaction Social media: मुलगी झाली हो (mulgi zali ho) या मालिकेतील प्रमुख अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) हे सध्या त्यांच्यावर झालेल्या व्यक्तिगत आरोपांमुळे चर्चेत आले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून किरण माने (Marathi Actor Kian Mane) यांच्यावर त्या मालिकेतील काही महिला कलाकारांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर माने यांच्या पत्नीनं राज्य महिला आयोगाकडे (State Women Comission) धाव घेतली होती. आयोगानं त्या तक्रारीची दखल घेत मालिकेच्या निर्मात्यांना तातडीनं लेखी खुलासा करण्यास सांगितला आहे. दुसरीकडे माने यांनी फेसबूकवर पुन्हा एक नवी पोस्ट शेयर करुन अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

त्या पोस्टमध्ये (Mane Social Media Post) माने यांनी म्हटलं आहे की, अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते... "किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय." असं तुला वाटायला लागलं... तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस... तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या... नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती...प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो... आणि मग पुन्हा आपलं "म्हातारेS-इलासाS " सुरू झालं...

परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं... पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं... कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता...असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो.

..माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही ! झगडणार... लढणार...तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय... जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं ! तुझ्यावर राग नाय गं माझा.. अशा शब्दांत किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माने यांनी आपण राजकीय पोस्ट लिहिल्यानं आपल्याला त्या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केला होता. त्यावरुन गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT