tejaswini pandit and prajakta mali
tejaswini pandit and prajakta mali  sakal
मनोरंजन

'रानबाजार' आहे तरी काय? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

युगंधर ताजणे

Marathi Entertainment News: मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे रानबाजार. दोन दिवसांपूर्वी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींचा टीझर व्हायरल झाला होता. (Social media news) त्यात तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींनी (Bollywood News) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. मराठी मालिका विश्वातील आतापर्यतची सर्वाधिक बोल्ड मालिका म्हणून रानबाजारच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तो बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांना तर धक्काच बसला आहे. प्रेक्षकांनी या दोन्ही अभिनेत्रींना नेहमीच वेगळ्या भूमिकेत पाहिलं आहे. आता त्या ज्या रुपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना रानबाजारचे वेध लागले आहेत.

वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे. या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT