Marathi Movie 'After Operation London cafe' release in 5 languages Google
मनोरंजन

बॉलीवूडला नाही,मराठी सिनेमाला 'या' साऊथ स्टारची पसंती; जाणून घ्या...

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीचा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे सिनेमा तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरला सर्वस्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कन्नड अभिनेता कवीश शेट्टीचा(Kaveesh Shetty) डॅशिंग लूक सगळ्यांनाच पसंत आला. त्या शिवाय एक मराठी सिनेमा इतर भाषेतही प्रदर्शित होतो आहे याचे कौतुकही होत आहे.(Marathi Movie 'After Operation London cafe' release in 5 languages)

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी निर्माते दीपक पांडुरंग राणे यांच्या या वेगळ्या वाटेचं कौतुक केले आहे. अभिनेता, एड गुरू भरत दाभोळकर, अभिनेत्री अश्विनी भावे, दिग्दर्शक समित कक्कड, गायिका प्रियांका बर्वे आणि सावनी रविंद्र, या शिवाय सोनाली खरे, ऐश्वर्या नारकर, तेजस्विनी पंडित, संदीप पाठक, अक्षया नाईक, पल्लवी सुभाष, दीप्ती देवी यांनी सोशल मिडीयावर सिनेमाला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या.

हे पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर नेटक-यांकडूनही याचे स्वागत करण्यात आले. मराठी प्रेक्षक वेगवेगळे विषय पाहायला उत्सुक असतो हे विविध प्रतिक्रीयांमधून समोर आले. नेहमी तमिळ, तेलगु सिनेमा आपण आपल्या इथे पाहातो. आता आपला मराठी सिनेमा इतर भाषेतही दाखवला जाणार याचेही स्वागत मराठी प्रेक्षकांनी केले आहे.

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीचा ‘आफ्टर ऑपरेशन लंंडन कॅफे’ हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी आणि मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.

अनेक सुपरहिट मराठी सिनेमांची निर्मीती केल्यानंतर निर्माते दीपक पांडुरंग राणे ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. या बद्दल सांगताना दीपक राणे म्हणतात,’’दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांनी त्यांच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमाही आपल्या सीमा ओलांडू शकतो. मराठी सिनेमा विषयी कुतुहल आणि कौतुक सर्वच सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही. त्यामुळेच आपणही आपला सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित केले पाहिजेत. त्यामुळे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.”

दीपक पांडुरंग राणे यांच्यासोबत विजय शेट्टी आणि रमेश कोठारी यांनीही आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेची निर्मीती केली आहे. हा सिनेमा २०२२मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT