मनोरंजन

इफ्फीच्या पहिल्या दिवशीच वाद

अवित बगळे

पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) वाद‌ होणे नवीन ‌नाही. यंदा पहिल्या दिवशीच वाद सुरु झाला आहे. याला कारण ठरले आहे, सह आयोजन संस्था असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेचे‌‌ माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांची अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या कक्षातील उपस्थिती.

श्रीवास्तव यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात महनीय व्यक्तिंच्या कक्षात बसण्याचे निमंत्रण कुणी व कुठल्या निकषांवर दिले ह्याचे स्पष्टीकरण गोवा फिल्म फ्रेटर्निर्टी फेडरेशनने इफ्फी आयोजकांकडून मागितले आहे. 

गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन मनोज श्रीवास्तव ह्यांच्यावर स्थानिक निर्माते तसेच मनोरंजन संस्थेच्या सदस्यांकडुनही गंभीर आरोप झाले होते व अशा वादग्रस्त व्यक्तिस महनीय कक्षात बसण्याचे निमंत्रण देवून मनोरंजन संस्थेने स्थानिक निर्मात्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचे फेडरेशनचे प्रवक्ते ओगी डिमेलो ह्यानी म्हटले आहे. 

गोवा फिल्म फ्रेटर्निर्टी फेडरेशनने मनोज श्रीवास्तव ह्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या शाॅर्ट फिल्म सेंटर घोटाळा, त्यांच्या गाडीला पहाटे झालेला अपघात, गोमंतकीय चित्रपट निर्मात्याना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक या विरूद्ध आवाज उठविला होता व त्यामुळेच सरकारने त्याना जबाबदारीतून मुक्त केले होते असे डिमेलो यांनी म्हटले आहे. 

इफ्फीत स्थानिक निर्मात्यांचे चित्रपट दाखविण्यासाठी खास विभाग सुरू केल्याचे सांगुन गोवा मनोरंजन संस्थेने स्थानिक चित्रपट निर्मात्यांची दिशाभूल केली असुन, सदर विभाग महोत्सवाचा अधिकृत विभाग नसल्याने सदर विभागात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्याना व कलाकाराना सरकारच्या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नसल्याचे ओगी डिमेलो यानी म्हटले आहे. 

गोवा मनोरंजन संस्थेत मनोज श्रीवास्तव याना परत आणण्याचा डाव संस्थेचा एक उच्चपदस्थ खेळत असून सरकारने तसे पाऊल उचलल्यास स्थानिक चित्रपट निर्मात्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT