मनोरंजन

अपर्णाचं सत्य येणार समोर! घरातून होणार हकालपट्टी

मालिकेत येणार पुन्हा नवा ट्विस्ट

शर्वरी जोशी

कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी. या मालिकेने पहिल्या भागापासून लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून या मालिकेत अनेक रंजक वळणं आली. त्यानंतर आता पुन्हा एक नवा ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ढालेपाटल्यांच्या संपत्तीसाठी सुजितसोबत लग्न करणाऱ्या अपर्णाचा खरा चेहरा ढालेपाटील कुटुंबासमोर येणार आहे. (marathi serial raja rani chi g jodi-latest-update)

श्रावणमास सुरु झाल्यामुळे या दिवसांमध्ये घरात सत्यनारायणाची पूजा करावी अशी बेबी मावशीची इच्छा होती. तसंच या पुजेला संजू आणि रणजीतने बसावं असा आग्रहदेखील तिने धरला होता. परंतु, या पुजेला अपर्णा आणि सुजितने बसावं असं आईसाहेबांची म्हणजेच कुसुमावतीची इच्छा होती. त्यामुळे या पुजेला अपर्णा-सुजित तयार होतात. मात्र, याच दिवशी संजू अपर्णाचं खरं रूप साऱ्यांसमोर आणणार आहे. इतकंच नाही तर अपर्णाने गरोदरपणाचं व बाळ गेल्याचं खोट नाटक केलं हेदेखील ती उघड करणार आहे.

अपर्णाने केवळ ढालेपाटल्यांच्या संपत्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी सुजितसोबत लग्न केलं होतं. हे सुजितला फार पूर्वीच कळून चुकलं होतं. मात्र,तरीदेखील तो संयमाने वागत होता. त्यातच अपर्णाने गरोदर असल्याचं व संजूमुळेच आपलं बाळ गेल्याचं खोटं नाटक केलं. मात्र, अर्पणाचं हे सत्य आता संजू सगळ्यांसमोर आणणार आहे. इतकंच नाही तर कुसुमावती स्वत: अपर्णाची घरातून हकालपट्टी करणार आहेत. त्यामुळे कुसुमावती व संजूमधील दुरावा आता तरी दूर होणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT