Marathi Serial Update- Satvya Mulichi Satavi Mulgi Esakal
मनोरंजन

Marathi Serial: सातव्या मुलीची सातवी मुलगी..व्हिलन रुपाली नाहीच..नव्या प्रोमोनं समोर आणला खऱ्या व्हिलनचा चेहरा

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रुपालीचं पितळ उघडं पडणार हे समोर येत असताना आता मोठा ट्वीस्ट आला आहे.

प्रणाली मोरे

Satvya Mulichi Satavi Mulgi: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत पहिल्यांदाच ऐश्वर्या नारकर या गोड अभिनेत्रीनं खलनायकी पात्र रंगवल्यानं प्रेक्षकही चवीचवीननं मालिकेचे भाग पाहताना दिसत आहेत.

नेत्रा आणि रुपालीतलं शीतयुद्ध मालिकेचा टीआरपी वाढवण्यात यशस्वी ठरत आहे. त्यात आता ग्रंथाचं रहस्य उलगडत असतानाच रुपालीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय..

खरी व्हिलन घरच्यांना कळली असं वाटतंय..तितक्यात एक मोठा ट्वीस्ट मालिकेत आल्यानं नवा प्रोमो पाहून सगळ्यांनाच शॉक बसला आहे.(Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi New Promo)

सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका भले अंधश्रद्धेच्या वाटेवर नेतेय असं वाटत असेल..पण यात नेत्राची त्रिनैना देवीवरची श्रद्धा आणि लोकांचं भलं होण्यासाठीची तळमळ एक सकारात्मक गुणही आपल्या सगळ्यांना प्रेक्षक म्हणून शिकवून जाते.

शेवटी ही मालिका आहे..मनोरंजन करणं हे तिचं प्रथम कर्तव्य त्यामुळे ते-ते स्वातंत्र्य हिच्या कथानकात घेतलं जातं. आता हे सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून असतं आपण काय घ्यायचं आणि काय नाही.

असो...आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय ज्यानं मालिकेत रुपाली व्हिलन नसून घरातीलच दुसरं कुणीतरी व्हिलन असल्याचं समोर आलं आहे.

मालिकेत रुपालीचा पहिला नवरा तिच्या मुलासमोर येतो...वडील मुलगा अनेक वर्षांनी भेटतात आणि मुलाला भेटून वडील जे जे घडलं ते सगळं काही सांगतात. आणि मग एक एक गोष्टी घडत जातात आणि रुपालीचं पितळ उघडं पडतं.

ही गोष्ट शेखर म्हणजे अद्वैतचे वडील जे नेत्राला अद्वैतच्या रक्षणासाठी घरी घेऊन येतात त्यांना कळते आणि ते रुपालीला घर सोडून जाण्यास सांगतात. बेडरुममध्ये शेखर रुपालीसोबत संवाद साधतानाचा एक प्रोमो व्हिडीओ व्हायरल होतोय.

ज्यावरनं स्पष्ट होत आहे की मालिकेत व्हिलन रुपाली नाहीच..व्हिलन तर घरातलीच ती दुसरी व्यक्ती..

आता हा बातमीत जोडलेला प्रोमो पाहिलात तर आपल्यासाठीही हा सर्वात मोठा धक्का असेल...तेव्हा वरचा प्रोमो नक्की पहा.म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी मधला खरा व्हिलन समोर येईल तुमच्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Regulatory Technology: अमेरिकेतील रेग्युलेटरी टेक्नॉलॉजी चा झपाट्याने वाढणारा उद; भारत ह्या संधीपासून दूर तर राहत नाहीये ना?

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: शेकापच्या मेळाव्यात संजय राऊत-राज ठाकरे एकत्र

चक्क 1 रुपयांत रिचार्ज! 'या' कंपनीने दिली सुपर ऑफर; मिळणार अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा अन् बरंच काही, बघा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT