titeeksha tawde: अभिनेत्री तितिक्षा तावडेने घेतली ब्रॅंड न्यू कार! व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress titeeksha tawde shared video she buy a new car

titeeksha tawde: अभिनेत्री तितिक्षा तावडेने घेतली ब्रॅंड न्यू कार! व्हिडिओ व्हायरल

titeeksha tawde: अनेक मराठी मालिकांमध्ये झळकलेला आणि गाजलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे. तितिक्षा आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. सध्या ती झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका सध्या बरीच चर्चेत असून तिने एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही बातमी मालिकेच्या संदर्भात नसून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आहे.

(actress titeeksha tawde shared video she buy a new car )

तितिक्षाने अत्यंत मेहनतीने मनोरंजन विश्वात आपले नाव मिळवले आहे. तिच्या यशाची वाटचाल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असे म्हणता येईल. कारण तितिक्षाने नवी कोरी कार खरेदी केली असून त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

हेही वाचा: Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरला गंडा!

तितिक्षासाठी यंदाची दिवाळी प्रचंड खास आहे. कारण तिने पहिली स्वतःची पहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. ही कार खरेदी करत असताना तिचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. “वेलकम किया. माझी पहिली कार.” असं तितिक्षाने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. या कारची किंमत लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे तितिक्षाने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची वाटचाल सुरू केली असे म्हणता येईल. या आनंदाच्या बातमीबद्दल सर्वांनी तिचे अभिनंदनही केले आहे.