mask man in marathi movie vicky welingkar
mask man in marathi movie vicky welingkar 
मनोरंजन

विक्की वेलिंगकर’मध्ये दिसणार 'मास्क मॅन'

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती ६  डिसेंबर २०१९ ला ‘विक्की वेलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईत ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर प्रकाशित केले. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. या मुखवट्यामागे नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. मात्र ही मराठीतील अनोखी संकल्पना असल्याचे प्रत्येकानेच मान्य केले आहे.

मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा या ‘विक्की वेलिंगकर’च्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र चांगल्याचा वाईटावर विजय होतो का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत वाट पहावी लागेल,” असे उद्गार या चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. वर्मा यांनी यापूर्वी  ‘मिकी व्हायरस’, ‘7 अवर्स टू गो’ आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

“ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही,” असेही सौरभ वर्मा यांनी म्हटले.

या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मंगळवारी प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा ‘मुखवट्यामागे चेहरा लपतो, रावण नाही’ अशाच आशयाची आहे, असेही दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT