Anita Date
Anita Date  
मनोरंजन

निसर्गाच्या सानिध्यात अनिता दातेची पती, मैत्रिणींसोबत खास ट्रिप

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनिता दाते केळकर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता अनिताने पती आणि तिच्या मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन केला. या खास ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बीच, जंगल, नदीकाठ, देवराई, वेगळेवेगळे प्राणी बघितले, पक्षी ओळखायला शिकलो, खूप मासे खाल्ले, अस्सल कोकणी जेवण केलं, असं तिने लिहिलं. 

पतीनेच केलं ट्रिपचं आयोजन
'फिरायला जाऊया कुठे तरी.. पण कुठे? असा प्रश्न नेहमीच पडतो. आम्ही घरात दोन माणसं. मी आणि माझा नवरा चिन्मय. आम्हा दोघांच्याही आवडी-निवडी भिन्न आहेत. फिरायला जाण्यासंदर्भात आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. तरी यावेळी आम्ही तो घाट घातलाच. २ दिवस सावंतवाडी, समुद्र आणि ३ दिवस जंगल फिरणे असा झोन ठरला. पक्षी, प्राणी, फुलं, फुलपाखरं, डोंगर, जंगल या सगळ्यांकडे कसं बघायचं? कसं फिरायचं? त्यासाठी त्या प्रत्येक घटकाकडे बघण्याची वेगळी दृष्टी असावी लागते. माझ्यात ती नाही. ती चिन्मयमध्ये आहे. तो त्यात अधिक रमतो. मला काही बेसिक पक्षी ओळखता येतात. पक्ष्यांचे आवाज कळत नाहीत. चिमणी चिव चिव, कावळा काव काव, साळुंकीची बडबड, कबुतरांचे आवाज आणि अजून दोन चार पक्षी आणि त्यांचे आवाज माहिती आहेत. पण चिन्मयमुळे मला आता रस निर्माण होतोय. त्याने मागे लागून आग्रही भूमिका घेऊन ही ट्रीप करवून आणली म्हणून हे घडतंय.'

'या पाच दिवसांत आम्ही खूप फिरलो. बीच, जंगल, नदीकाठ, देवराई, वेगळेवेगळे प्राणी बघितले, पक्षी ओळखायला शिकलो, खूप मासे खाल्ले. अस्सल कोकणी जेवण केलं. मौज आली. आमच्या ट्रीप मध्ये आमच्या दोन मैत्रिणी स्नेहा माजगावकर आणि पल्लवी पाटील सोबत होत्या. मग तर आणखी मज्जा. पण या ट्रीपमध्ये निसर्गाची खरी शाळा भरली ती वनोशी फॉरेस्ट होमस्टे मध्ये. ज्या तरुणाने हे उभारलं आहे तो प्रवीण देसाई आणि त्याचा सहकारी विशाल आमचे मित्र झाले. त्यांनी सोप्या पद्धतीने आम्हाला गोष्टी बघायला शिकवल्या, दाखवल्या', अशी पोस्ट अनिताने लिहिली. 

अनिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनिताने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत राधिकाची भूमिका साकारली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT