MeToo cintaa to form a committee against sexual harassment with raveena tondon renuka shahane swara bhaskar
MeToo cintaa to form a committee against sexual harassment with raveena tondon renuka shahane swara bhaskar 
मनोरंजन

#MeToo : 'या' अभिनेत्री 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधून लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकर यांच्यावरील आरोपानंतर बॉलिवूडमधून लैंगिक शोषणाच्या तक्रारींचं सत्र काही थांबेना. तनुश्रीने आता दहा वर्षांनंतर जरी आवाज उठविला असला तरी तिने याबाबत 'सिने अॅन्ड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (सिंटा) कडे दहा वर्षांपूर्वीच यासंबंधी तक्रार नोंदवली होती. पण 'तेव्हा सिंटा तनुश्रीच्या तक्रारीचे निवारण करण्यात असमर्थ ठरले. याबाबत सिंटातर्फे क्षमस्व.' अशी माफी सिंटाचे सध्याचे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी मागितली होती. पण आता या शोषणाविरोधात सिंटाने कंबर कसली आहे. सिंटा लवकरच लैंगिक शोषणाविरोधात समितीची स्थापना करणार आहे. ज्या समितीत बॉलिवूड मधील काही बड्या अभिनेत्रींना सदस्यत्व देण्यात येणार आहे. 

अभिनेत्री रविना टंडन हिने स्वतः या समितीचा भाग होऊन पीडितांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय अभिनेत्री रेणुका शहाणे, स्वरा भास्कर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे यांचाही या समितीत समावेश असेल. लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक समितीच्या वकील आणि मानसोपचारतज्ञ यांचीही निवड समितीवर करण्यात येईल. तसेच उपसमितीची स्थापना करुन लैंगिक शोषणाबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. अशा प्रकणांमध्ये एखादा कलाकार दोषी सिध्द झाल्यास बॉलिवूडमधील कुठल्याच व्यक्तीने त्याच्यासोबत काम करु नये, यासाठी ही समिती प्रयत्नशील राहील. 

तसेच लैंगिक शोषणाप्रमाणेच सिनेमा आणि टीव्ही विश्वात काम करताना कामाचे तास, सेटवरील अमानवी वागणूक, कमी मानधन असा प्रकरणांमध्येही निर्मात्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सिंटातर्फे सुशांत सिंग यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT