मनोरंजन

अभिनेता राणा दुग्गुबत्ती आणि मिहीका बजाज विवाह बंधनात

संतोष भिंगार्डे

मुंबईः  बाहुबली या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा साऊथचा सुपरस्टार राणा दुग्गबत्तीने त्याची गर्लफ्रेण्ड मिहिका बजाजबरोबर लग्नाची गाठ बांधली आहे. हैदराबाद येथील डी. रामानायडू स्टुडिओमध्ये हा विवाह संपन्न झाला. तेलगू आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतीने विधी करण्यात आले. या नवपरिणीत दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी साऊथमधील काही मोजकी मंडळी उपस्थित होती.

राणा दुग्गुबत्ती आणि मिहीका बजाज यांची लव्हस्टोरी गेली अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती. त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरस झाले होते. राणाच्या वडिलांनी ते दोघे ८ ऑगस्टला विवाह बंधनात अडकतील असे सोशल मीडियावर सांगितले होते आणि काल त्यांनी आपली काही मित्रमंडळी आणि दोन्ही घरची नातेवाईक मंडळी यांच्या उपस्थितीत फेरे घेतले. त्यावेळी सरकारने दिलेले कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्यात आली.

मिहिकाचे सौंदर्य  वधूच्या रूपात फुलून दिसत होते तर राणा देखील वराच्या रूपात उठावदार दिसत होता. मिहिका उत्तर भारतीय कुटुंबातील आहे. पण तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. ती तेलगु भाषाही बोलते. ता राणा आणि मिहिका यांच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. एका फोटोत मिहिका गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे आणि त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. तसंच मिहिकाने हा ड्रेस अतिशय सुंदरपणे सांभाळला. तर दुसरीकडे, नवरदेव राणाने पांढऱ्या रंगाच्या कुर्तामध्ये कोरोनापासून सुरक्षा म्हणून मास्क घालून फोटोसाठी एक छान पोज दिली आहे. 

दुसर्‍या फोटोत हे दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पहात आहेत. या दोघांची केमिस्ट्री या फोटोतून स्पष्टपणे दिसते. तसंच त्यांच्या मेंदी समारंभाचेही काही फोटो सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. ज्यात मिहिका पिवळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये आणि राणा पांढऱ्या रंगाच्या झब्ब्यात शोभून दिसत आहेत. कोरोनाच्या काळात राणा आणि मिहिकाचे लग्न सर्वात हाय-प्रोफाइल आणि रॉयल असल्याचे म्हटले जाते.

(संपादनः पूजा विचारे)

Miheeka Bajaj And Rana Daggubati are married Wedding ceremony

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT