मनोरंजन

'सांस्कृतिक खातं अस्तित्वात आहे का?': नाट्यगृहांचा प्रश्न ऐरणीवर

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर संकट आहे. त्याचा मोठा परिणाम थिएटर मालक, चालक यांच्यावर झाला आहे.

युगंधर ताजणे

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर संकट आहे. त्याचा मोठा परिणाम थिएटर मालक, चालक यांच्यावर झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून थिएटर, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यापूर्वी अनेदकदा सांस्कृतिक विभागाला राज्यातील कलाकारांच्या शिष्टमंडळानं निवेदनं दिली आहे. त्यांच्याकडे तातडीनं थिएटर सुरु करण्याची मागणीही केली आहे. येत्या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं थिएटर सुरु करणार असल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही होण्याची चिन्हं दिसत नाही. अशावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सरकारच्या सांस्कृतिक क्षेत्राविषयीच्या धोरणांवर टीकाही केली आहे.

खोपकर यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या त्या व्टिटला अनेकांनी प्रतिसादही दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटगृहं आणि नाट्यगृहं कधी सुरु होणार याबद्दल ठोस माहिती सांगणारं सांस्कृतिक खातं राज्यात अस्तित्वात आहे की नाहीच? पन्नास टक्के आसनक्षमतेने परवानगी देण्याचा फार्स न करता ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झालेले आहेत अशा प्रेक्षकांना प्रवेश देऊन रंगमंच कामगार, थिएटर स्टाफ, कलाकार, तंत्रज्ञ यांची उपासमार सरकार ने त्वरित थांबवावी. अशा शब्दांत खोपकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून थिएटर चालक, मालक आणि कर्मचारी यांनी सरकारला थिएटर सुरु करण्यासाठी मागण्यांची निवेदनं दिली आहेत. त्यावर सरकारनं त्यांना केवळ आश्वासनं दिली आहे. त्याची कार्यवाही झालेली नाही. असेही दिसून आले आहे.

सरकारच्या धोरणांबाबत यापूर्वी मुंबई, पुणे याबरोबर इतर शहरांमध्येही काही कलाकारांनी निदर्शनं केली होती. यात प्रामुख्यानं बॅक स्टेज कलाकारांचाही मोठा वाटा होता. त्यांना अजूनही मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अडचण म्हणजे थिएटर चालकांना अजूनही थिएटर सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी मिळावी म्हणून यापूर्वी अनेकदा कलाकारांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे. मात्र निवेदनं घेऊनही त्यावर कोणताच विचार झालेला नाही. असं दिसून आलं आहे. त्यामुळे येत्या काळात कलाकार मंडळी आक्रमक पवित्रा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात अजूनही सौम्य पद्धतीनं सरकारला विनंती करण्याचं काम सुरु असल्याचं दिसून आलं आहे. इतर राज्यांनी मात्र थिएटर सुरु करण्य़ासाठी परवानगी दिली असल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यात कर्नाटक, तामिळनाडू यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT