Mouni Roy, Suraj Nambiar Google
मनोरंजन

Video: मौनीला हे शोभतं का?आपल्याच लग्नात बार काऊन्टरवर चढून कोण नाचते

अभिनेत्रीनं गोवा इथे बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली आहे.

प्रणाली मोरे

जवळपास सतरा वर्षांपूर्वी 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतून प्रसिद्ध पात्र तुलसीची मुलगी 'कृष्णा तुलसी' रंगवून मौनी रॉय(Mouni Roy) छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. त्यानंतर 'नागिन' या मालिके मधूनही तिला पसंद केलं गेलं. पण मौनीला फक्त तिथेच रमायचं नव्हतं. तिनं बॉलीवूडमध्येही मोठ्या मेहनतीनं आपली ओळख बनवली. चांगले सिनेमे तिच्या नावावर आहेत. नुकतंच तिनं आपल्या बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न केले आहे. गोव्यात मोजक्याच मित्रपरिवाराच्या अन् नातेवाईकांच्या उपस्थितीत तिचं लग्न थाटात पार पडलं. तिच्या लग्नातील समारंभाचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आपण पाहिला असेल.

पण आता नुकताच आणखी एक व्हिडीओ तिच्या लग्नाच्या पार्टीतील व्हायरल झालाय. ज्यानं काही तासांतच लाखोंनी व्ह्यूज मिळवले आहेत. या व्हिडीओत मौनी बार काऊन्टरवर नाचताना दिसत आहे. आता नववधूला असं पाहणं साऱ्यांसाठीच कदाचित धक्का असू शकतो. मौनी आणि सूरजने एक पोस्ट वेडिंग पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना निमंत्रण देण्यात आले होते. याच पार्टीतले काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका व्हिडीओमध्ये मौनी तिच्या गर्ल गॅंगसोबत बार काऊंटरवर उभी राहून डान्स करत असल्याचं दिसत आहे.

मौनी रॉयच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मौनीची खास मैत्रिण मंदिरा बेदी(Mandira Bedi),आशका गोराडिया,मनमीत सिंह आणि त्याची पत्नी,अर्जुन बिजलानी,ओमकार कपूर आणि अनेक जणांची नावं घेता येतील. मौनी आणि सूरजच्या लग्नातील पहिला फोटो तिचा जवळचा मित्र अभिनेता अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केला होता. या दोघांच्या लग्नाआधी पार पडणाऱ्या सगळ्या सोहळ्यांमध्येही मंदिरा बेदी,अर्जुन बिजलानी अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT