Mukesh Khanna blasts adipurush makers over saif ali khan look  Google
मनोरंजन

Adipurush: 'तुझ्या धर्माचा,धार्मिक व्यक्तिरेखांचा खेळ करशील का?', सैफवर भडकले मुकेश खन्ना

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमाच्या टीझरमधील व्हीएफएक्स पाहून,रावणाचा अवतार पाहून मुकेश खन्नांच्या तळपायाची आग थेट मस्तकाला जाऊन भिडलीय.

प्रणाली मोरे

Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि सिनेमातील व्हीएफएक्स पाहून लोकांच्या तळपायाची आग थेट मस्तकाला जाऊन भिडली. केवळ सर्वसामान्य लोक नाहीत तर मनोरंजन सृष्टीतूनही सिनेमाचा टीझर पाहून संतापजन्य प्रतिक्रिया समोर येत आहेत. टीझरमधील राम,रावण,हनुमानाचा लूक लोकांना रुचला नाहीय. त्यात अधिककरुन रावण आणि हनुमान तर भलतेच खटकलेयत लोकांना. रामानंद सागर यांच्या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्यानंतर आता शक्तीमान फेम मुकेश खन्ना यांनी आदिपुरुषच्या टीझरवर आपला राग काढला आहे,आणि या वादात उडी घेतलीय. मुकेश खन्ना म्हणालेत,''हिंदू देव-देवतांच्या लूकचा जर यांनी खेळखंडोबा केलाय तर यांचा सिनेमा मूळीच चालणार नाही. लोक यांच्या तोंडावर बॉयकॉट नावाचा असा थप्पड मारतील की यांना कळणारही नाही''.(Mukesh Khanna blasts adipurush makers over saif ali khan look)

२०२० मध्ये जेव्हा सैफ अली खान म्हणाला होता की,''तो आदिपुरुषमधील त्याच्या रावणाच्या व्यक्तीरेखेला खूप प्रेमळ बनवेल ज्यानं लोकांचे मनोरंजन होईल''. आता त्याच्या याच वक्तव्याला समोर आणत मुकेश खन्ना यांनी त्याला खूप सुनावलं आहे. मुकेश खन्ना यांनी आदिपुरुषचा टीझर पाहिल्यावर त्यात रावण बनलेल्या सैफला पाहून त्यांचा पार चढला आहे. सैफ त्यांना रावण कमी ,खिलजीच जास्त वाटतोय. मुकेश खन्ना सिनेमाच्या मेकर्सवर भडकत म्हणाले, '' देशात बॉयकॉटची हवा सुरु असताना लोक पुन्हा चिडतील,नवा वाद सुरु करतील असं काम पुन्हा करण्यात काय शहाणपणा आहे?'' मुकेश खन्ना यांनी एवढं पण म्हटलं की पैशाचा वापर हिंदू धर्माच्या व्यक्तिरेखांचा अपमान करण्यासाठी करु नका. नाहीतर परिणाम चांगला होणार नाही.

मुकेश खन्ना यांनी आदिपुरुषवरनं उठलेल्या वादावर भाष्य करणारा एक व्हिडीओ आपल्या युट्युब अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी सिनेमातील वादावर सविस्तर भाष्य केलं आहे. सोबत सैफ आली खानसोबत आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सना देखील चेतावनी दिली आहे. मुकेश खन्ना म्हणाले,''हिंदू धर्माचा नुसता खेळ करुन ठेवला आहे. देवी-देवतांचे लूक बदलाल तर तुमचा सिनेमा चालणार नाही. सगळ्याच वाहिन्यांवर एकच बातमी दाखवतायत की रावण बनलेला सैफ खिलजी दिसत आहे,रावण नाही. बरोबर आहे, हा आपला रावण दिसतच नाही. मुघलांसारखा लूक दिल्यावर कसा दिसेल हा रावण. कुठे राम,कुठे रामायण आणि कुठे हा मुघलांचा लूक? विनोद आहे का हा? नाही चालणार सिनेमा. जर तुम्हाला वाटतं की फक्त स्पेशल इफेक्ट्सनी सिनेमा हिट होईल तर ते चुकीचं आहे. १०० करोड खर्च करा किंवा १००० करोड खर्च करा,रामायणावरचा सिनेमा असा नाही बनत. रामायण त्याच्या मूल्यांवर, श्रद्धेवर,लुकवर आणि संवादांवर बनतं''.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले,''जर तुम्ही 'अवतार' सिनेमासारखा टच या सिनेमाला देऊन मग बोलाल की आम्ही रामायणावर आधारित सिनेमा बनवला आहे तर ते कसे पटेल लोकांना. सिनेमात वटवाघळं उडतायत,त्याच्यावर बसून रावणाला उडताना दाखवलं आहे, हे सगळं कसं काय दाखवू शकता? रावणाची दहा तोंडं दाखवाल आणि त्याला खिलजीचा लूक द्याल तर लोक हसणारच तुमच्यावर. मी या पैशेवाल्यांना सांगतोय की तुम्ही जे केलं आहे त्याचा परिणाम चांगला होणार नाही. तुम्ही धार्मिक व्यक्तिरेखांची छेडछाड पैशाच्या आधारावर केलीय. यावर एवढा पैसा खर्च नका करू. आपल्या धर्माचा खेळखंडोबा करा. हिंदूं धर्माचा नाही''.

सैफवर भडकत मुकेश खन्ना म्हणाले,''तु कोणतीही भूमिका कर,ती कशीही तुझ्या पद्धतीनं साकार, तुला कोणी थांबवू शकत नाही. हे एका अभिनेत्याचा स्वतःचा विचार असतो. तो त्याला हवं तसं ती भूमिका साकारू शकतो. पण जेव्हा रामायणाचा प्रश्न येतो तुम्ही त्याच्यासोबत छेडछाड करू शकत नाही. तुम्ही लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत आहात. जेव्हा तु मागे म्हणालेलास,'आम्ही रामायण घेऊन येतोय,तेव्हा लोकांनी स्वागतच केलेलं तुमचं. पण जेव्हा तु म्हणालास की आम्ही रावणाची व्यक्तीरेखा बदलेल्या स्वरुपात आणतोय, आणि ती देखील अशी जी आता आम्ही पाहतोय टीझरमध्ये, तेव्हा जो कोणी हिंदू धार्मिक असेल तो मात्र मग हातात छडी घेऊनच उभा राहील. जसं माझं झालं. मलाही वाटतंय तुम्ही कोण आहात रामायणातील व्यक्तीरेखा बदलणारे? तु तुझ्या धर्मातील धार्मिक व्यक्तिरेखांना बदलशील का?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT