Shilpa Shetty With Mother Sunanda Shetty Google
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ;फसवणूक प्रकरणी कोर्टानं दिला निर्णय

वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडण्यास शिल्पा,शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्याविरोधात व्यावसायिकानं तक्रार नोंदवली होती.

प्रणाली मोरे

कोर्ट-कचेऱ्या,पोलिसांचा ससेमिरा अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)ची पाठ काही सोडत नाहीय. नवरा राज कु्ंद्रा अश्लील फिल्म निर्मिती प्रकरणात जेलमध्ये गेला अन् तिच्या मागे एका मागे एक अडचणी येऊच लागल्यात. आता तिच्या वडिलांच्या एका जुन्या व्यवहारामुळे त्यांच्या अख्ख्या शेट्टी कुटुंबाच्या मागे कोर्टकचेरीचा तगादा लागला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? चला जाणून घेऊया.

एका व्यावसायिकानं असा आरोप केलाय की,शिल्पा शेट्टीचे वडिल सुरेंद्र शेट्टी यांना २०१७ मध्ये व्याजासह काही रक्कम त्याला परत करायची होती. त्यानं तक्रारीत नमूद केलंय की, २०१५ पर्यंत शिल्पा शेट्टी,शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी सुरेंद्र शेट्टी यांनी घेतलेलं कर्ज चुकवलेलं नाही. शिल्पाच्या वडिलांनी या व्यावसायिकाकडून वयाच्या १८ व्या वर्षी दरवर्षी द्यायच्या व्याजाच्या हिशोबानं कर्ज घेतलं होतं. पण वडिलांच्या मृत्यूनंतर हे कर्ज फेडण्यास शिल्पा,शमिता आणि त्यांच्या आईनं नकार दिला. असा आरोप व्यावसायिकांन आपल्या तक्रारीत केला होता.

Raj Kundra, Shilpa Shetty, Shamita Shetty, Sunanda Shetty, Surendra Shetty(Shilpa's Father)

शिल्पाच्या आईला या प्रकरणात अंधेरी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. महानगर दंडाधिकारी आर.आर,खान यांनी याआधी शिल्पा शेट्टी,बहिण शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांना फसवणूकी प्रकरणात समन्स बजावलं होतं. पण या समन्सला शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबियांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती ए.झेड. खान यांनी शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी विरोधात महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र शिल्पाच्या आईला या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. कारण ज्या कंपनीच्या व्यवहाराप्रकरणात हे कर्ज घेण्यात आले होते त्या कंपनीत शिल्पाचे वडिल सुरेंद्र शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी दोघेही भागीदार होते. यात शिल्पा-शमिता भागीदार असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्यानं या कर्जाशी त्यांचा काही संबंध नाही हे स्पष्ट झालं आहे,असं न्यायालयानं सांगितलंय. पण आईला दिलासा मिळाला नसल्यानं शिल्पाच्या मागे कोर्टाचा तगादा अन् कटकटी सुरूच राहणार आहेत हे देखील स्पष्ट झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT