मनोरंजन

खुळाच झालो गं’ ची तमाम मराठी मनांना भुरळ

संभाजी गंडमाळे

मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर राहिला. सध्या ‘यूट्युब’वर अभिनेता नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर प्रसिद्ध जोडीवर चित्रित केलेले ‘खुळाच झालो गं’ हे गाणं तमाम मराठी मनांना भुरळ घालत आहे. केवळ दोन दिवसात हे गाणं तब्बल दहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. गाण्याला संगीताबरोबच पार्श्‍वगायनही माझचं आहे. युवा संगीतकार ऐश्वर्य मालगावे संवाद साधत असतो आणि कलापूरची जिगर काय असते, याची प्रचितीही मिळत असते. 

एकूणच फिल्म इंडस्ट्रीत करिअरसाठी अनेकांनी मुंबई गाठली असली तरी ऐश्‍वर्य मात्र कोल्हापुरात राहूनच यशाला गवसणी घालतो आहे. ऐश्‍वर्यच्या घरी चार पिढ्यांपासून किराणा मालाचा व्यवसाय. माईसाहेब बावडेकर शाळेतून माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर कलानिकेतन महाविद्यालयातून त्यांने ‘जी. डी. आर्ट कमर्शिअल’ केले.

मुळात त्याला संगीताची आवड इतकी की शिक्षण घेत असल्यापासूनच जाहिरातींसाठी जिंगल्स, माहितीपट, लघुपटांसाठी तो संगीत देवू लागला. एक वर्ष पुण्यात ग्राफिक डिझायनर म्हणूनही एका जाहिरात एजन्सीत काम केले. पण, संगीत काही सोडवत नव्हते. पुन्हा कोल्हापुरात तो आला. संगीत शिक्षक श्री. साकव यांचं मार्गदर्शन तो घेवू लागला.

पुढे लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक या कॉलेजमधून वेस्टर्न क्‍लासिकल संगीताचे धडेही त्याने घेतले आणि सात वर्षापूर्वी राजारामपुरीत स्वतःचा ‘कॉर्डस दि म्युझिक स्टुडिओ’ या नावाने स्टुडिओ सुरू केला. आजवर अनेक हिंदी, मराठी, कन्नड आणि मल्याळम्‌ चित्रपटांना त्यानं संगीत दिलं आणि कैक लघुपटांसाठी पार्श्‍वसंगीतही दिले. ‘हॅप्पीमॅन’, ‘चौकट’, ‘जेंटलमन’ या लघुपटांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले.

कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी गेल्याच वर्षी  ‘सलाम कारगिल’ हे गाणे त्याने तयार केले. त्याची दखल घेऊन भारतीय नौदल सेनेवर तयार केलेल्या माहितीपटासाठी संगीत संयोजनाची संधी त्याला मिळाली. एका हिंदी चित्रपटासाठी सध्या तो पार्श्वसंगीत देत असून ‘खुलाच झालो गं’ गाण्याचं यश त्याला पुन्हा नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा देणार आहे. 

कलापूर कोल्हापुरात राहूनच यशस्वी संगीतकार होण्याचे स्वप्न बाळगले. यशाचा एकेक टप्पा पार करत पुढे चाललो आहे. पुढचा प्रवास नक्कीच यशोलौकिकाच्या शिखरावर पोचवेल, हा आत्मविश्‍वास नक्कीच आहे.
- ऐश्‍वर्य मालगावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Vidarbha FDA Raids : वर्ध्यात ‘पतंजली’ सुपर मार्टवर छापा, तर यवतमाळमध्ये पान टपऱ्यांवर कारवाई; विदर्भात FDA ची धडक मोहीम

Nasrapur Crime Case : नसरापूर खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर; न्यायालयात एकाच दिवशी दहा साक्षीदारांची साक्ष

Bhandara Crime : "प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग मित्रांना बोलावून बेडरूममध्ये...''; अल्पवयीन तरुणीसोबत भयानक घडलं; पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT