दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य Naga Chaitanya यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. पण 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थने Siddharth अप्रत्यक्षपणे समंथावर निशाणा साधला आहे. समंथाने घटस्फोट जाहीर केल्यानंतर काही तासांतच सिद्धार्थने केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटद्वारे त्याने समंथाला उपरोधिक टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.
नाग चैतन्यशी लग्न करण्यापूर्वी समंथा सिद्धार्थला डेट करत होती. करिअरच्या सुरुवातीला या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ब्रेकअप झाल्यानंतर दोघं एकमेकांवर आरोप करताना दिसले होते. समंथाच्या घटस्फोटानंतर सिद्धार्थने ट्विट करत लिहिलं, 'शाळेतील शिक्षकांकडून शिकलेल्या पहिल्या धड्यांपैकी एक म्हणजे.. फसवणूक करणाऱ्यांचं कधीच भलं होत नाही. तुम्ही कोणता धडा शिकलात?' सिद्धार्थने यात कोणाचा उल्लेख केला नसला तरी त्याने समंथाला टोला लगावला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.
यापूर्वी एका मुलाखतीमध्ये समंथाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी वक्तव्य केलं होतं. ‘अभिनेत्री सावित्रीप्रमाणेच माझं वैयक्तिक आयुष्यातदेखील अनेक संकटे होती. सुदैवाने मला वाईट नात्यांबद्दल लवकर जाणीव झाली आणि मी त्यातून बाहेर पडले’, असं ती म्हणाली होती. सिद्धार्थने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. 'रंग दे बसंती', 'स्ट्राइकर' आणि 'चश्मेबद्दूर' अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.