Naga Chaitanya wish Good luck to brother Venkat Prabhu esakal
मनोरंजन

GOAT: थलापती विजयचा 'गोट' शाहरुखच्या 'जवान' चा रिमेक तर नाही ना? काय आहे 'स्टोरी'?

नव्या वर्षातील बॉलीवूड, टॉलीवूड चित्रपटांची नावं आता समोर येऊ लागली आहेत.

युगंधर ताजणे

Naga Chaitanya wish Good luck to brother Venkat Prabhu : नव्या वर्षातील बॉलीवूड, टॉलीवूड चित्रपटांची नावं आता समोर येऊ लागली आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेतील आणि उत्सुकतेचा विषय असणाऱ्या थलापती विजय अन् नागा चैतन्याच्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. त्या चित्रपटाचं नव्यानं नामकरणही करण्यात आले आहे.

२०२३ मध्ये थलापती विजयच्या लिओनं कमाल केली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात संजय दत्तनं व्हिलनची भूमिका साकारली होती. तर त्रिशानं मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका पार पाडली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या सगळ्यात विजयच्या नव्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता होता.

लिओनंतर थलापती विजय, नागा चैतन्य यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले होते. यापूर्वी त्या चित्रपटाचे नाव थलापती ६८ असे होते. आता ते बदलण्यात आले असून आता तो चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' असा ओळखला जाणार आहे. त्याचे नवे पोस्टर नेटकऱ्यांचे, चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

नागा चैतन्यनं खास पोस्ट शेयर करुन थलापती विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक वेंकट प्रभू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' मध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयचा डबल रोल असून तो चित्रपट चाहत्यांच्या प्रचंड कुतूहलाचा विषय आहे. हा चित्रपट बाप आणि मुलगा यांच्या नात्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या पोस्टरमध्ये दोघेजण सैन्याच्या वेषात दिसत आहे. आणि त्यांच्या डोक्यावरुन विमान घोंघावताना दिसत आहे.

विजयच्या त्या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामध्ये अनेकांनी हा चित्रपट शाहरुखच्या जवानचा रिमेक तर नाही ना...असा प्रश्न विचारला आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'मध्ये विजयसोबतच माईक मोहन, जयराम, प्रभु देवा, मीनाक्षी चौधरी, योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

युवान शंकर राजा यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असून त्याचे दिग्दर्शन वेंकट यांनी केले आहे. यापूर्वी वेंकट प्रभुनं नागा चैतन्यासोबत २०२३ मध्ये कस्टडी नावाची फिल्म केली होती. त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानं बॉक्स ऑफिसवरही जेमतेम कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT