Meera Chopra  esakal
मनोरंजन

Meera Chopra : भारतीय राजकारणातील रंग बदलणारा सरडा कोण? प्रियंकाच्या बहिणीचा थेट सवाल

यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी इंडिया शब्दांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

Lets collectively call BHARAT from today - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील प्रमुख विरोक्षी पक्ष एकटवले असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काल बंगळुरुमध्ये सर्व विरोक्षीपक्षांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी इंडिया नावानं आघाडी तयार केली आहे. या नावानं ते मोदी आणि भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे.

यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी इंडिया शब्दांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्रानं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं विरोधीपक्षांवर निशाणा साधत कडक शब्दांत टीका केली आहे. सोशल मीडियावर तिच्या ट्विटनं लक्ष वेधून घेतले आहे. त्याची चर्चाही होत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मीरानं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील टीका केली आहे. राजकीय पक्षांमधील रंग बदलणारे नेते त्यामुळे देशाची होणारी अवस्था यावर मीरानं सणसणीत टीका केली आहे. ती म्हणते, आपण आता इंडिया म्हणणे बंद करु. भारत म्हणायला सुरुवात करुया. मीराच्या त्या ट्विटवर अनेकांनी तिला उत्तर दिलं आहे. आताच्या राजकारणात एक सरडा आहे. तुम्हाला त्याचे नाव माहिती आहे का....असा प्रश्नही मीरानं यावेळी विचारला आहे.

काही जणांनी विनाकारण वेगळे वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे फायदे तोटे काय यावर आपण बोलतच नाही. यासगळ्यानं खूप वेदना होत आहेत. अजूनही कोणत्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत, असंही मीरानं विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय परिस्थिती वेगानं बदलते आहे. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांच्या या बैठकीत त्यांच्या युतीचं नाव तृणमूल कॉंग्रेसच्या पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सुचवलंय. मात्र, त्यानंतर INDIA च्या विस्तृत रुपावर चर्चा करण्यात आली आणि त्याचा फुल फॉर्म इंडियन नॅशनल डेवलपमेंट इन्क्लुसिव अलायंस असं निश्चित करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT