
Famous YouTuber Manish Kashyap joins Jan Suraaj: बिहारचे प्रसिद्ध युट्यूबर आणि माजी भाजप नेते मनीष कश्यप यांनी आज (सोमवार) जन सूराज पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत ते जन सूराज पक्षात सामील झाले. पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
मनीष कश्यप हे ‘जन सूराज’मध्ये सामील झाल्याबद्दल पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले की, ‘’मनीष कश्यप ‘जन सूराज’साठी युट्यूबर नाही, माजी भाजप नेते नाही तर बिहारचे एक सुपुत्र आहेत, ज्यांनी स्वतःच्या ताकदीने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या शहाणपणाने आपली ओळख निर्माण केली आहे व बिहारसाठी ते काहीतरी करू इच्छित आहेत.’’
याचबरोबर प्रशांत किशोर यांनी असेही सांगितले की, ‘जन सूराज’ ही एक अशी व्यवस्था आहे, जी बिहारसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणाला किंवा व्यक्तीला संधी देते. जर ते जन सूराजशी जुडले आहेत, तर मी त्यांची मोठी भूमिका बघतोय, की पुढे जाऊन तो बिहारच्या या परिवर्तन मोहिमेत मोठी भूमिका बजावतील.
मनीष कश्यप यांनी जून २०२५ मध्ये भाजपमधून राजीनामा दिला होता, त्यानंतर ते जन सूराज पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मनीष कश्यप २०२५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सूराजच्या तिकिटावर चंपाटिया मतदारसंघातून लढू शकतात. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मनीष यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, आम्ही विझलेल्या आशा पेटवू, आम्ही प्रत्येक घरात प्रकाश आणू, आम्ही स्थलांतराचे दुःख पुसून टाकू, आम्ही पुन्हा एक नवीन बिहार निर्माण करू. जन सूराजमध्ये त्यांचा प्रवेश बिहारच्या राजकारणातील एक मोठा बदल म्हणून पाहिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.