Narendra Modi PM India Anup Jalota Singer
Narendra Modi PM India Anup Jalota Singer  esakal
मनोरंजन

Narendra Modi : 'पाकिस्तानी सुद्धा मोदींवर प्रेम करतात, सिडनीकरांना तर ते पर्मनंट पंतप्रधान हवेत'!

युगंधर ताजणे

Narendra Modi PM India Anup Jalota Singer : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहे. मोदीजी हे ऑस्ट्रेलियामध्ये जी ७ च्या शिखर परिषदेमध्ये असून त्यामध्ये जगातील वेगवेगळे देश सहभागी झाले आहेत.

यासगळ्यात मोदींजीचा प्रभाव किती कमालीचा आहे हे दिसून आले आहे. अमेरिका, जपान, फ्रान्स, चीन, ब्रिटन या देशांचे राष्ट्रपती या शिखर परिषदेमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर मोदींच्याबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांची केलेली बातचीत, संवाद याचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक, भजनसम्राट अनुप जलोटा यांनी मोदींविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यात जलोटा यांनी मोदींचे कौतूक केले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी जलोटा यांच्या त्या प्रतिक्रियेवर भन्नाट प्रतिसाद दिला आहे.

जलोटा यांनी म्हटले आहे की, मोदी यांना ऑस्ट्रेलियामध्ये मिळणारा प्रतिसाद मोठा आणि कौतूकास्पद आहे. जगभरातील लोकं मोदींवर प्रेम करतात. यात पाकिस्तानच्या लोकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना मोदींसारखा नेता हवा आहे. तर सिडनीमधल्या लोकांना असे वाटते की, मोदीजी हे भारताचे कायमस्वरुपी पंतप्रधान राहावेत. जलोटा यांच्या त्या प्रतिक्रियेनं सोशल मीडियावर वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

मोदी हे गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये जी ७ मध्ये व्यस्त आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहेत. आतापर्यत त्या समिटमध्ये जे देश सहभागी झाले आहेत त्यांनी मोदींचे खूप कौतूक केले आहे. पापुआ न्यु गिनीच्या पंतप्रधानांनी तर मोदींचे केलेले स्वागत अनेकांच्या चर्चांचा विषय झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT