Navjot Singh Sidhu Shares His Wife Navjot Kaurs First Chemotherapy Video Viral  
मनोरंजन

Navjot Singh Sidhu Wife: 'देवाची इच्छा..', नवज्योत सिंग सिद्धूनं शेअर केला कॅन्सरग्रस्त पत्नीचा केमो थेरपीनंतरचा व्हिडिओ

Vaishali Patil

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र शिक्षेचं एक वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान आता पुन्हा सिद्धू चर्चेत आले आहे. त्याचं कारणही तितकच भावनिक आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांना कॅन्सर झाल्याची माहिती काही दिवसांपुर्वीच त्यांनी पोस्ट शेअर करत दिली होती. त्या कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

(Navjot Singh Sidhu shares his wife Navjot Kaur's first chemotherapy video viral)

आपल्या आजाराची बातमी देताना नवज्योतने एक भावनिक चिठ्ठी देखील लिहिली होती. आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

डॉ. नवज्योत कौर यांनी अलीकडेच मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात 23 एप्रिल रोजी ऑपरेशन केल्यानंतर त्यांची पहिली केमोथेरपी झाली. पती-पत्नी दोघांनीही याबाबतचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सिद्धूने त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे.

पत्नीच्या पहिल्या केमोथेरपीनंतर, नवज्योत सिद्धूने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'जेव्हा तुम्ही जीवनातील चांगले आणि वाईट सर्वच प्रसंग हे देवाची कृपा म्हणून स्वीकारता तेव्हा सर्वकाही नदीसारखं वाहत असतं… देवाच्या इच्छेला अधीन राहूनच.. रजा में राजी…' या व्हिडिओत नवजोत बेडवर झोपलेल्या दिसत आहे आणि त्याच्या बेडच्या बाजूला एक नर्स उभी आहे. नवज्योत कौर या गाणी ऐकत आहे.

तर स्वत: डॉ. नवज्योत कौर यांनीही पहिल्या केमोथेरपीचा अनुभव पोस्ट करून शेअर केला. डॉ नवज्योत कौर म्हणाल्या की, 'पहिली केमोथेरपी, ध्यानाच्या मदतीने दैवी उपचारांचा अनुभव. जग चालवणाऱ्या सर्वोच्च शक्तीला शरण जा. जीवनातील आनंद आणि आनंद समजून घेण्यासाठी दुःख अनुभवणं महत्वाचे आहे. लव्ह ऑल'

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्याचे चाहते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT