Dr. Amol Kolhe, Uddhav Thackeray 
मनोरंजन

राज्यातील थिएटर्स १००% क्षमतेने सुरु करा, अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारचा हा नियम थिएटर व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे.

स्वाती वेमूल

'राज्य सरकारचा हा नियम थिएटर व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे.'

राज्यातील थिएटर्स १०० टक्के क्षमतेने सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे Dr Amol Kolhe यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना CM Uddhav Thackeray पत्र लिहित केली. कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली. मात्र राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन १०० टक्के क्षमतेने थिएटर्स सुरू करावेत. कारण कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशी मागणी कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

'थिएटर सुरू करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत ५० टक्के क्षमतेने आणि दोन प्रेक्षकांमधील एक आसन रिकामं ठेवण्याचे नमूद केले आहे. राज्य सरकारचा हा नियम थिएटर व्यवसायाच्या मुळावर घाव घालणार आहे. नाटक व चित्रपट हे कौटुंबिक मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे सहकुटुंब नाटक पाहायला जाणारे प्रेक्षक नाटक पाहायला जाणारच नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ५० टक्के क्षमतेने नाट्यप्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कोविडचे संकट गंभीर असल्यामुळे, नाटक, चित्रपट मनोरंजन व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या हजारो छोट्या-मोठ्या कलावंतांसह तांत्रिक कर्मचारी आदींची आर्थिक कुचंबणा झाली असतानाही त्या परिस्थितीत सर्वांनी शासनाला सहकार्य केलं. आता ट्रेन, बसेससह सार्वजनिक वाहतूक, मॉल्स तसेच दैनंदिन गर्दीच्या ठिकाणी शासनाने २ डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत देत परवानगी दिली असताना केवळ थिएटरला ५० टक्के क्षमतेची अट व्यावसायिकदृष्ट्या मनोरंजन क्षेत्रासाठी हानिकारक आहे, असं त्यांनी पत्रात लिहिलंय.

चित्रपटगृहे, नाट्यगृहांसाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून, सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मास्क बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Trades : चेन्नईने सॅमसनच्या बदल्यात जडेजा अन् सॅम करणला का जाऊ दिलं? CSK ने अखेर सांगितली Inside Story

IND vs SA Test: रवींद्र जडेजाने घडवला इतिहास! दहावी धाव घेताच कपिल देव यांची केली बरोबरी

YouTube बनला तुमचा AI असिस्टंट! प्रत्येक व्हिडिओला विचारू शकता कोणताही प्रश्न; क्षणात मिळणार उत्तर..कसं वापरायचं? पाहा

म्हणून मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीने अभिनय करणं सोडलं; सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाली- अपमानास्पद बोलणं...

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT