neena
neena 
मनोरंजन

सुभाष घईंची 'ती' कमेंट ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था

स्वाती वेमूल

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' Khalnayak या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' Choli Ke Peeche song हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यामुळे त्यावेळी 'खलनायक' हा चित्रपट चर्चेत आला होता. अनेकांनी त्यावर अश्लील गाणं असल्याचा आरोप केला. तर गाण्यातील अभिनेत्री नीना गुप्ता, माधुरी दीक्षित आणि ईला अरुण यांच्यावरही टीका झाली. नीना गुप्ता Neena Gupta यांनी आता त्यांच्या 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रात गाण्याच्या शूटिंगसंदर्भातील एक खुलासा केला आहे. (Neena Gupta recalls feeling embarrassed after Subhash Ghai demanded she wear padded bra for Choli Ke Peeche song)

'ते गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला ते आवडलं. पण गाणं शूट करताना मी खूप नर्व्हस होते. मला गुजराती आदिवासी कपडे देण्यात आले होते आणि गाण्यासाठी तयार झाल्यानंतर मला सुभाष घई यांच्याकडे पाठवलं. मी पूर्ण तयार होऊन त्यांच्यासमोर उभी राहिले आणि त्यांनी मला पाहताच, नो नो नो, कुछ भरो.. असं म्हणत ओरडू लागले. ते ऐकून मला खूप ओशाळल्यासारखं झालं. माझ्या मते, ते माझ्या ब्लाऊजबद्दल बोलत होते. त्या दिवशी मी शूटिंग केले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मी सेटवर पोहोचले तेव्हा मला हेवी पॅडेड ब्रा दिली गेली होती', असं त्यांनी पुस्तकात लिहिलं.

नीना यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र १४ जून रोजी प्रकाशित झालं. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही बरेच खुलासे केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT