neetu kapoor 
मनोरंजन

अभिनेत्री नीतू कपूर यांच्या कोरोना रिपोर्टचे अपडेट येताच मुलगी रिद्धीमाने शेअर केली पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिनेता वरुण धवन, मनीष पॉल आणि क्रिती सॅनन  या कलाकारां पाठोपाठ अभिनेत्री नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या कोरोना रिपोर्टचे अपडेट समोर आले आहेत. नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नीतू कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘तुम्ही सर्वांनी माझ्या आईसाठी प्रार्थना केल्याबद्दल तुमचे आभार. माझ्या आईचा कोरोना रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहे’ अशी माहिती रिद्धिमाने दिली आहे.

नीतू कपूर आगामी ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होत्या. या सिनेमाचं शूटींग सुरु असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत सगळ्यांना माहिती दिली होती.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्या प्रती काळजी आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा आणि काळजी घ्या”, अशी पोस्ट नीतू कपूर यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यावर केली होती. आता त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

neetu kapoor tests negative for covid 19 daughter riddhima kapoor sahni shares update  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांची शक्यता?

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT