कंगना म्हणाली 'दिलजीत कित्थे आ', दिलजीतने दिलं मजेशीर उत्तर

kangna diljit
kangna diljit

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटरवर शेतकरी आंदोलनावरून चांगलंच वॉर रंगलंय. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कंगनाने दिलजित आणि प्रियांका चोप्रावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विट करत कंगनाने दिलजीतला डिवचलं आहे. 

कंगनाने दिलजीतला डिवचत ट्विट केलं आहे की, ‘आज हैदराबादमध्ये बारा तास काम केल्यानंतर संध्याकाळी मी चेन्नईला एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मी कशी दिसतेय?’ असं ट्विट करत ‘दिलजीत कित्थे आ’ म्हणजेच दिलजित कुठे आहे? हा हॅशटॅग जोडलाय. ट्विटरवर प्रत्येकजण त्याला शोधत आहे, असं ती पुढे म्हणाली.

कंगनाच्या या ट्विटला आता दिलजीतनेही त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. 
दिलजीतने कंगनाचा उल्लेख न करता त्याचं दिवसभराचं वेळापत्रकच ट्विटरवर पोस्ट केलं आहे. ‘सकाळी उठल्यानंतर मी जिममध्ये व्यायाम केला. त्यानंतर दिवसभर काम आणि मग रात्री झोपी गेलो’, असं उपरोधिक ट्विट करत त्याने कंगनाला मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.

दिलजीतने शेतकऱ्यांना एकजुटीनं लढण्याचा संदेश ट्विटरवरून दिला होता. याच ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे, असं ट्विट केलं होतं. प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे निश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’

प्रिय दिलजीत आणि प्रियांका.. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल किंवा तुम्ही तुमच्या आईचा आदर करत असाल तर हा कृषी कायदा नक्की काय आहे? ते एकदा जाणून घ्या. तुम्हाला शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे का?, असं ट्विट करत कंगनाने दोघांवर निशाणा साधला होता. 

diljit dosanjh responds to diljit kitthe aa trending on twitter after kangana ranaut tweets  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com