Neha Dhupia-Angad Bedi Instagram
मनोरंजन

नेहा धुपिया अंगद बेदीनं केलं बाळाचं नामकरण

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) केवळ तिच्या इंडस्ट्रीतील सर्वोत्तम पात्रांसाठीच नव्हे तर तिच्या बोल्डनेस साठी सुध्दा ओळखली जाते. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. गेल्या वर्षी नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली. नेहाचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने (Angad Bedi)त्यांच्या मुलाच्या जन्माविषयीची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करून लिहिले होते, "बेदींचा मुलगा आला आहे! देवाने आज आम्हाला एका मुलाचा आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि बाळ दोघेही बरे आहेत. मेहर (Meher Bedi)पण खुश आहे. वाहेगुरु मेहर करे.'' तो मग नेहाचे आभार देखील मानतो.

Neha Dhupia-Angad Bedi

गेल्या वर्षी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी त्यांच्या दुस-या बाळाला जन्म दिला. शनिवारी, या जोडप्याने त्याचे नाव त्यांच्या चाहत्यांसह आणि इन्स्टाफॅमसह शेअर केले.

पती अंगद बेदी, मुलगी मेहर आणि गुरिकला हातात धरून एक छान फोटो शेअर करताना, बेदी कुटुंब त्यांच्या पूल टाइमचा आनंद घेताना दिसत आहे. दुसर्‍या चित्रात, तिने प्रेमाने आपल्या मुलाला पकडले आहे. कॅप्शनमध्ये नेहाने लिहिले, "आमचा मुलगा गुरिक (Gureek Bedi).''

अंगदने एक इंस्टाग्राम रील देखील पोस्ट केली आणि लिहिले, ''गुरिक सिंग! आमचा सिंह राजा गुरिक सिंग धुपिया बेदी. प्रेमाने तुम्ही त्याला बेदी साहब म्हणू शकता.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT