Netizens Boycott Vikram Vedha On twitter, saif ali khan old video viral, controvesial statement
Netizens Boycott Vikram Vedha On twitter, saif ali khan old video viral, controvesial statement Google
मनोरंजन

Boycott Vikram Vedha: 'मुलाचं नाव राम तर नाही ठेवणार...', सैफच्या व्हिडीओनं खळबळ

प्रणाली मोरे

Boycott Vikram Vedha: हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित 'विक्रम वेधा' रिलीजच्या वाटेवर आहे पण याआधीच ट्वीटरवर बॉयकॉट गॅंगनं पुन्हा सक्रिय होत सिनेमाविरोधात आवाज उठवला आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा गायत्री आणि पुष्कर दिग्दर्शित विक्रम वेधाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे साऊथमध्ये याच नावानं बनलेल्या सिनेमाचा हा हिंदी रीमेक आहे. साऊथच्या सिनेमात विजय सेतुपति आणि आर माधवन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयानं सिनेमाला हीट केलं होतं. (Netizens Boycott Vikram Vedha On twitter, saif ali khan old video viral, controvesial statement)

आता लोकांचे म्हणणे आहे की हा सिनेमा त्यांनी आधीच पाहिला आहे मग पुन्हा तेच-तेच पाहण्यात वेळ कशाला फुकट घालवायचा. लोकांनी हृतिक आणि सैफच्या या सिनेमाला स्वस्तातला खालच्या दर्जाचा कॉपी पेस्ट सिनेमा असं देखील म्हणून झालंय. यादरम्यान सैफ आणि करिनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे,ज्यात सैफ म्हणत आहे की आपल्या मुलाचं नाव तो राम किंवा त्यासंबंधित एखादं नाव ठेवू शकत नाही. तर दुसरीकडे करिना आपल्या मुलाचं तैमूरचं नाव घेत मोघल शासनाची प्रशंसा करताना दिसत आहे. आता यावरनं नेटकऱ्यांचा पारा चढला आहे.

या जुन्या व्हिडीओत सैफ अली खान म्हणताना दिसत आहे,''मी माझ्या मुलाचं नाव अलेक्झॅंडर नाही ठेवू शकत आणि त्याचं नाव मी रामही ठेवू शकत नाही,तर मग एखादं मुस्लिम नाव का ठेवू नये मी?'' याच व्हिडीओत करिना कपूर म्हणतेय,''जसे शूर लढवय्ये मुघल, तसाच तैमूर''. करिना आपल्या मुलाचं तैमूर हे नाव घेताना मुघलांची जरा अधिकच प्रशंसा करताना दिसत आहे. जेव्हा सैफ-करिनानं आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं तेव्हा संपूर्ण देशात हंगामा झाला होता. तैमूरलंग एक तुर्कस्थानी शासनकर्ता होता. त्यानं १४ व्या शतकात भारतात खूप लूटमार केली होती. लोकांवर खूप अत्याचार केले होते. हजारो लोकांना जीवे मारलं होतं. त्यामुळेच जेव्हा सैफ-करिनानं आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हा लोक खूप भडकले होते.

लोक आता हा सगळा राग विक्रम वेधावर काढताना दिसत आहेत. काही म्हणतायत,'बॉलीवूड कधी सुधारणार, रीमेक बनवून मुळ कलाकृतीची वाट लावणं कधी थांबवणार हे लोक'.

तर कुणी म्हणतंय,'जे आधी पाहिलंय,त्याची स्वस्त कॉपी पहायला पुन्हा कोण पैसे खर्च करणार. आम्ही फक्त मणिरत्नमचा PS-1 पाहणार,ज्यात ऐश्वर्या राय आम्हाला पाहता येईल'.

विक्रम वेधाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. पहिल्या दिवशी सिनेमानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ४५ लाख रुपये कमाई केली. बोललं जात आहे की यात अधिक कमाई होणं गरजेचं आहे आणि यासाठी सिनेमाच्या टीमला कंबर कसावी लागेल.

हृतिक आणि सैफचा 'विक्रम वेधा' ३० सप्टेंबरला रीलिज होत आहे. याच्या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी व्हर्जन याआधीच ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. साऊथच्या विक्रम वेधात विजय सेतुपति आणि आर माधवन यांनी जबरदस्त अभिनय केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT