Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khan 
मनोरंजन

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाला विरोध; #BoycottKareenaKhan होतोय ट्रेंड

स्वाती वेमूल

दोन वर्षांपूर्वी 'रामायण' Ramayan या पौराणिक कथेवर आधारित बिग बजेट चित्रपटाची घोषणा झाली. आता या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर खान Kareena Kapoor Khan ही सीतेच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर या चित्रपटासाठी करीनाने १२ कोटी रुपयांचं मानधन मागितल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चांवर आता सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त होत आहेत. सीतेच्या भूमिकेसाठी करीना योग्य नाही, असं नेटकऱ्यांचं म्हणणं असून ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. (netizens opposing Kareena Kapoor Khan to Play Sita demanding to boycott actress)

आधी या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे राम-सीतेची भूमिका साकारणार, अशी चर्चा होती. मात्र दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी स्पष्ट केलं की, चित्रपटासाठी कलाकारांची निवड अजून झालीच नाही. सध्या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू असल्याचं दिग्दर्शक रवी उदयवार म्हणाले. नितेश आणि रवी हे दोघं मिळून या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

लेखक के विजयेंद्र प्रसाद यांनी 'स्पॉटबॉय ई'ला दिलेल्या मुलाखतीत करीनाच्या भूमिकेविषयीच्या चर्चा फेटाळल्या. तर दुसऱ्या एका चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत असल्याने सोशल मीडियावर करीनाच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली, असंही काही नेटकऱ्यांचं मत आहे. 'रामायणा'वर आधारित हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून सर्वांत आधी यातील भूमिकेसाठी हृतिक रोशनच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT