chi.jpg
chi.jpg 
मनोरंजन

Video : मेगास्टार चिरंजीवीच्या वाढदिवसानिमित्त नव्या चित्रपटाचा टिजर

वृत्तसंस्था

मुंबई : साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा आज वाढदिवस आहे. साउथचे चित्रपटप्रेमी त्यांच्यावर अपार प्रेम करतात. त्यांचा एखादा चित्रपट येणार असेल तर त्यांचा फॅन क्लब अक्षरश: लाइन लावून तिकीट घेऊन चित्रपट पाहतात. सुपरस्टार रजणीकांतप्रमाणेच चिरंजीवी यांचाही एक वेगळाच फॅन क्लब आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्टि़टरवर आज हॅपी बर्थडे मेगा स्टार आणि हॅपी बर्थडे एव्हरग्रीन मेगास्टार असे ट्रेंड सुरु आहेत.

सोशल मिडियावरती आज मोठ्या प्रमाणात याचीच जोरात चर्चा सुरु आहे. साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी' चा टीजर काल रिलीज झाला. टीजरवरून चित्रपटाची कथा आणि अॅक्शन खूप दमदार असेल असे दिसते आहे.

तसेच चित्रपटातील ग्राफिक्सही खूप दमदार दिसत आहे. चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हेदेखील गेस्ट रोलमध्ये दिसणार आहेत. ही कथा स्वातंत्र्य सेनानीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. टीजर पाहिल्यानंतर सर्वांचीच उत्सूकता आता वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT