Bandukya poster
Bandukya poster 
मनोरंजन

सेन्साॅर: चित्रपटातील शिव्यांना म्युट नाही; तर ए प्रमाणपत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या आईच्या वरातीत नाचती"; अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेशुमार शिव्यांच्या धडाका असलेला "बंदूक्या" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर सिनेमात शिव्या आल्या की एकतर सेन्साॅर कडून त्यावर म्युट येत असे किंवा ते सीन कापण्याच्या सूचना केल्या जात असत. पण आता, या सिनेमातली भाषेची गरज ओळखून बोर्डाने या सिनेमाला ए प्रमाणपत्र दिले आहे. 

राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बंदूक्या' सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत.

सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना याचा अनुभव नक्की घ्यायला आवडेल.

अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा एक अविभाज्य आणि संरक्षक घटक असल्याने 'बंदूक्या' हा  वेगळ्या धाटणीचा तसेच  मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटी बाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल यात शंका नाही. 'बंदूक्या' हा सिनेमा एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं प्रमोशन आणि मार्केटिंग सीबा पीआर आणि मार्केटिंग सांभाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT